Hindutva Leaders : भाजपा आमदार राजा सिंह, नुपूर शर्मा, सुरेश चव्हाणके यांच्या हत्येचा कट रचणारा मौलवी गजाआड; सुरत गुन्हे शाखेची कारवाई

121

गुजरात पोलिसांच्या सुरत गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवार, 4 मे रोजी 27 वर्षीय मौलवी मोहम्मद सोहेल उर्फ अबुबकर तेमोलला याला अटक केली. त्यानंतर त्याच्याकडून धक्कादायक खुलासे बाहेर पडले आहेत. या मौलवीने भाजपाचे तेलंगणा येथील आमदार राजा सिंह, भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा, सनातन संघाचे अध्यक्ष उपदेश राणा आणि सुदर्शन वाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके या हिंदुत्वाच्या नेत्यांच्या (Hindutva Leaders) हत्येचा कट रचला होता, अशी माहिती उघड झाली.

हा मौलवी पाकिस्तान आणि नेपाळमधील आपल्या लोकांसोबत राहून या सर्वांना धमकी देत होता. गुन्हे शाखेने मौलवी मोहम्मद सोहेलचा फोनही जप्त केला आहे. गेल्या दीड वर्षांपासून तो पाकिस्तानमधील मोबाईल क्रमांकावरून डोंगर नावाच्या व्यक्तीशी आणि नेपाळमधील शहनाज नावाच्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क करायचा. उपदेश राणा या हिंदुत्ववादी नेत्याच्या (Hindutva Leaders) हत्येसाठी एक कोटी रुपयांची सुपारी निश्चित करण्यात आली होती.

(हेही वाचा Rajnath Singh : पाकव्याप्त काश्मीर घेण्यासाठी बळाचा वापर करण्याची गरज भासणार नाही; राजनाथ सिंह यांचा विश्वास)

मौलवीने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याचा डोंगर आणि शहनाजशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क होता. अबुबकरला सुरतमधील चौकबाजार येथून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तो करगुगाम येथील मदरशात हाफिज आणि आलिम आहे. यापूर्वी करझाई आंबोली गावात मुस्लिम मुलांना इस्लाम शिकवत असे. कमलेश तिवारीप्रमाणेच उपदेशचा खून करण्याची तयारी होती. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, कमलेश तिवारी या हिंदुत्ववादी नेत्यांची (Hindutva Leaders) 2019 साली यूपीमध्ये हत्या करण्यात आली होती. तसेच उपदेश राणा यांच्या हत्येचा कट रचला जात होता. मौलवी उपदेशला वेगवेगळ्या नंबरवरून जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. उपदेश यांच्या हत्येसाठी एक कोटी रुपयांची सुपारी दिल्याची बाबही गप्पांमध्ये समोर आली आहे. अबुबकरला त्याच्या पाकिस्तानी आणि नेपाळी मित्रांनी लाओस देशाचे सिमकार्डही दिले होते.

यादरम्यान पाकिस्तानकडून शस्त्रे आयात करण्याबाबतही गप्पा झाल्या होत्या. हे 9 मिमी पिस्तूलबद्दल बोलत होते. या प्रकरणी मी देशभरात अनेक तक्रारी केल्या आहेत, असे उपदेश सांगतात. आता एका मौलवीला अटक करण्यात आली आहे. तपासात आणखी अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, असे आवाहन मी पोलिसांना करतो.

(हेही वाचा Devendra Fadnavis: काँग्रेस अजमल कसाबसारख्या दहशतबाद्यांसोबत आहे, फडणवीसांचा पलटवार

अबुबकरवर नजर ठेवली जात होती

सुरतचे पोलिस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांनी सांगितले की, अबुबकर देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर त्याच्यावर नजर ठेवण्यात आली होती. त्याने जातीय द्वेष पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आहे, भारतीय राष्ट्रध्वजाची छायाचित्रे अपलोड केली आहेत आणि हिंदू धर्माबद्दलच्या पोस्ट आणि व्हिडिओंमध्ये अश्लील टिप्पण्या केल्या आहेत. तसेच चुकीचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार केले आणि परदेशी हँडलर्सकडून शस्त्रे मागवली.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.