Vitthal-Rukmini Temple: भाविकांसाठी खुशखबर! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार असल्याची माहिती विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीन दिले आहे. मंदिर समितीच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे.

102
Vitthal-Rukmini Temple: आषाढी यात्रेत ७ जुलैपासून १८ दिवस घेता येणार विठ्ठलाचे २४ तास दर्शन

वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरनगरीतील (Pandharpur) विठ्ठल रुक्मिणी मातेच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या जवळपास अडीच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल-रुक्मिणीचे (Vitthal-Rukmini Temple) पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. पुढील महिन्यापासून म्हणजेच जूनपासून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे. अशी माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (Vitthal-Rukmini Temple)समितीने दिली आहे. (Vitthal-Rukmini Temple)

(हेही वाचा – BJPच्या राजवटीत महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले म्हणणाऱ्यांना सोशल मीडियातून उत्तर)

पंढरपुरच्या रुक्मिणी मंदिरात संवर्धन आणि सुशोभिकरणाचे काम सुरू असल्याने १५ मार्चपासून पदस्पर्श दर्शन बंद होते. आता आषाढी वारीच्या (Ashadhi Vari) एक महिना आधी मंदिरातील पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. याकाळात भाविकांना रोज सकाळी ५ ते ११ या कालावधीत मुख दर्शन घेता येत होते. तसेच मंदिराच्या बाहेर स्क्रीनवर विठुरायाच्या दर्शनाची सोय करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा पदस्पर्श दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (Vitthal-Rukmini Temple)

(हेही वाचा – IPL 2024 Rohit Sharma : रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी शेवटचा सामना खेळला का?)

शनिवारी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज (Gahininath Maharaj) यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यातील काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर येत्या ०२ जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले. तसेच आषाढी यात्रेच्या निमित्ताने ७ जुलैपासून विठूरायांचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे.‌ (Vitthal-Rukmini Temple)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.