Naxal Attack : झारखंडमध्ये चकमकीत ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान!

72
Naxal Attack : झारखंडमध्ये चकमकीत ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान!
Naxal Attack : झारखंडमध्ये चकमकीत ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान!

झारखंडच्या (Jharkhand) पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत (Naxal Attack) पोलिसांच्या कोब्रा पथकाने 4 नक्षलवाद्यांना ठार केले. यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांसह टायगर उर्फ पांडू हंसदा आणि बटारी देवगम यांना अटक करण्यात आली. (Naxal Attack)

(हेही वाचा –West Bengal Train Accident : “आमच्या बोगीला अचानक जोरदार धक्का बसला आणि…” प्रवाशाने सांगितला अपघातावेळीचा प्रसंग!)

झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील लिपुंगा जंगलात कोब्रा आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 नक्षलवादी ठार झाले. या नक्षलवाद्यांवर 25 लाखांचे बक्षीस होते. या नक्षलवाद्यांनी 9 महिन्यांपूर्वी सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनच्या जवानाची हत्या केली होती. कोब्रा कमांडो बरेच दिवस या नक्षलवाद्यांचा शोध घेत होते. त्यानंतर आज, सोमवारी हे नक्षलवादी आणि कोब्रा बटालियनच्या जवानांमध्ये चकमक उडाली. यात 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तसेच 2 कट्टर नक्षल्यांना अटक केली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये सब झोनल कमिटी सदस्य कांदे होनहागा उर्फ दिरशुम, एरिया कमिटी सदस्य सिंगराई उर्फ मनोज, एलजीएसएम सूर्या उर्फ मुंडा देवगाम आणि महिला नक्षलवादी जोंगा तुर्की यांचा समावेश आहे. नक्षलवाद्यांच्या ताब्यातून दोन एसएलआर, एक इन्सास आणि दोन थ्री-नॉट-थ्री रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन नक्षलवाद्यांमध्ये टायगर उर्फ पांडू हंसदा आणि बटारी देवगम यांचा समावेश आहे. (Naxal Attack)

(हेही वाचा –Bengali Sweets: आता घरच्या घरी बनवा बंगाली मिठाई; जाणुन घ्या सोपी पद्धत)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोब्राने आपल्या शहीद साथीदाराचा बदला घेतला आहे. कोब्रा कमांडोबद्दल असे म्हटले जाते की ते आपल्या साथीदारांसाठी आपला जीव धोक्यात घालतात. या चकमकीत कोब्राचा ‘पॅशन आणि साहस’ पाहायला मिळाले. कोब्रा बटालियनने ठार केलेले नक्षलवादी तेच होते ज्यांनी सुमारे 9 महिन्यांपूर्वी कोब्रा कमांडो राजेशला एका हल्ल्यात ठार केले होते. (Naxal Attack)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.