Sakshi Malik : कुस्तीपासून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेणार आहे? यावर साक्षी मलिक म्हणाली…

156

क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांना निलंबित करण्याबरोबरच त्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणीदेखील बरखास्त केली आहे. या निर्णयाचे कुस्तीपटूंकडून स्वागत होत आहे. मात्र या निवडणुकीनंतर कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु आता सरकारने संजय सिंह यांची कार्यकारिणी निलंबित केल्यानंतर साक्षी (Sakshi Malik) तिचा निर्णय मागे घेणार का, असे तिला विचारताच तिने याबाबत जो काही निर्णय ठरेल तो मु तुम्हाला सांगेन असे सांगत तिचा निर्णय तिने अजून राखून ठेवला आहे.

संजय सिंह हे कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाल्यामुळे साक्षी मलिक हिने कुस्तीला कायमचा रामराम केला होता. तसेच बजरंग पुनिया याने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. त्यानंतर बजरंग पंतप्रधान निवासाबाहेरच्या फूटपाथवर ठेवून पदक ठेवून तिथून निघून गेला होता. त्यामुळे संजय सिंह यांच्या निलंबनानंतर हे दोन्ही खेळाडू त्यांचा निर्णय मागे घेणार का? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. साक्षी मलिक  (Sakshi Malik)  हिने क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले. ती म्हणाली, “आमचा लढा देशाच्या सरकारविरोधात कधीच नव्हता. आमचा लढा केवळ एका माणसाविरोधात होता. कारण आम्हाला आपल्या खेळाडूंच्या भवितव्याची चिंता आहे. नव्या मुली कुस्तीच्या मैदानात उतरत आहेत. या मुलींची आम्हाला काळजी आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या पद्धतीने ही लढाई लढत आहोत. मी तर आधीच संन्यास घेतला आहे. त्यामुळे माझी आता एवढीच इच्छा आहे की आपल्या भारताच्या लेकींना न्याय मिळायला हवा.”

(हेही वाचा Jagdeep Dhankhar : मला तुम्हाला लाजवायचे नाही पण…; उपराष्ट्रपती धनखड यांचे मल्लिकार्जुन खर्गेंना चर्चेचे निमंत्रण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.