Jagdeep Dhankhar : मला तुम्हाला लाजवायचे नाही पण…; उपराष्ट्रपती धनखड यांचे मल्लिकार्जुन खर्गेंना चर्चेचे निमंत्रण

Jagdeep Dhankhar : मला या प्रकरणामध्ये मुख्य विरोधी पक्षाची पूर्वनियोजित भूमिका दाखवून तुम्हाला लाजवायची इच्छा नाही, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पत्राद्बारे लिहिले आहे.

156
Jagdeep Dhankhar : मला तुम्हाला लाजवायचे नाही पण...; उपराष्ट्रपती धनखड यांचे मल्लिकार्जुन खर्गेंना चर्चेचे निमंत्रण
Jagdeep Dhankhar : मला तुम्हाला लाजवायचे नाही पण...; उपराष्ट्रपती धनखड यांचे मल्लिकार्जुन खर्गेंना चर्चेचे निमंत्रण

संसदेतील व्यत्यय आणि विरोधी खासदारांचे निलंबन या मुद्द्यावर चर्चेसाठी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना २५ डिसेंबर रोजी चर्चेचे निमंत्रण दिले आहे. निमंत्रणासाठी लिहिलेल्या पत्रात त्यांनी पुन्हा विरोधी पक्षनेत्यांना खडे बोल सुनावले आहेत.

(हेही वाचा – Drugs Free Mumbai : ड्रग्ज विरोधात मोठा लढा लढावा लागेल; उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन)

पूर्वनियोजित भूमिका दाखवून लाजवायची इच्छा नाही 

उपराष्ट्रपती धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी म्हटले आहे की, ”सभागृहातील व्यत्यय जाणूनबुजून आणि रणनीतीनुसार होता. मला या प्रकरणामध्ये मुख्य विरोधी पक्षाची पूर्वनियोजित भूमिका दाखवून तुम्हाला लाजवायची इच्छा नाही, परंतु जेव्हाही मला तुमच्याशी बोलण्याची संधी मिळेल, तेव्हा मी ते तुमच्याशी याविषयी नक्कीच बोलीन.”

आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. 25 डिसेंबर रोजी किंवा त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही वेळी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी चर्चेसाठी निमंत्रित केले, असे जमदीप धनखड पुढे म्हटले.

(हेही वाचा – Rammandir Dombivli : डोंबिवली येथे उभारली राममंदिराची प्रतिकृती; 2 महिने घेता येणार दर्शन)

मल्लिकार्जुन खरगे यांनी लिहिले होते उपराष्ट्रपतींना पत्र

22 डिसेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष (Congress President) मल्लिकार्जुन खरगे यांनी उपराष्ट्रपतींना पत्र लिहून सांगितले की, इतक्या मोठ्या प्रमाणावर खासदारांच्या निलंबनामुळे त्यांना दुःख झाले आहे. लोकशाहीत (Democracy) विरोधी पक्षाचा (opposition party) आवाज महत्त्वाचा असतो; पण या निलंबनामुळे हानी होणार आहे. उपराष्ट्रपतींनी आता खरगे यांना 25 डिसेंबर रोजी त्यांच्या घरी चर्चेसाठी आमंत्रित केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.