Congress : कमळालाच मत देणार म्हणणाऱ्या महिला कामगाराला काँग्रेसच्या उमेदवाराने मारली थप्पड 

143

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि इंदूर (निजामाबाद) लोकसभा मतदारसंघातील उमेदवार तातिपर्थी जीवन रेड्डी यांनी येथील एका महिल कामगाराला थप्पड मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या महिलेने लोकसभा निवडणुकीत कमळालाच मतदान करणार असल्याचे सांगितल्यावर रेड्डी यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी महिलेला थप्पड मारली.

(हेही वाचा Vijay Wadettivar : विजय वडेट्टीवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया; म्हणाले, हा २६/११ च्या हल्ल्यातील मृतांचा अनादर)

काँग्रेसविषयी नाराजी व्यक्त केली

ही घटना अरमुर विधानसभा मतदारसंघातील एका गावात उघडकीस आली, जिथे रेड्डी हे इतर नेत्यांसमवेत प्रचार करत होते. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या महिलेने काँग्रेसला  (Congress) मतदान केल्याचे सांगण्यात येत आहे. आता निवृत्तीवेतनाचा लाभ मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसविषयी नाराजी व्यक्त केली. त्या वेळी वरील घटना घडली. निवडणुकीसाठी काँग्रेसने रेड्डी यांना भाजपाचे विद्यमान खासदार धर्मपुरी अरविंद यांच्या विरोधात उभे केले आहे. यावरून कॉँग्रेसच्या उमेदवारांची दडपशाही समोर येत आहे. सर्व सामान्य मतदारांना धमकावण्याचा त्यांच्यावर दबाव टाकण्याचा कॉँग्रेसचे उमेदवार करत असल्याचे यातून सिद्ध होत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.