‘जातीसाठी माती खाऊ नका’ ; बीडमधील मेळाव्यात Pankaja Munde आक्रमक 

बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ बीड येथील महायुतीचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर पंकजा मुंडेंनी भाषण केलं.

112
‘जातीसाठी माती खाऊ नका’ ; बीडमधील मेळाव्यात Pankaja Munde आक्रमक 

लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या निवडणुकीसाठी प्रचारसभांची रणधुमाळी सुरू असून, उमेदवार दिवसरात्र प्रचार सभांसाठी मेहनत करताना दिसत आहेत. यातच भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंच्या (Panjaka Munde) लढतीकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्यामुळे प्रचारसभांची रंगत वाढू लागली आहे. बीडमध्ये (Beed) शुक्रवारी पंकजा मुंडे यांचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्याला पंकजा मुंडेंसह, मंत्री धनंजय मुंडेही (Minister Dhananjay Munde) हजर होते. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांच्यावर जोरदार टीका केली. (Pankaja Munde)

(हेही वाचा – Accident: ६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अजिंठा घाटात अपघात)

काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?

बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ बीड येथील महायुतीचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर पंकजा मुंडेंनी भाषण केलं. ही निवडणूक आता तुम्ही हातात घ्या, मला बैठका किंवा सभा घ्यायला लावू नका. राज्यातून साडे तीन खासदार निवडून येणाऱ्याला निवडून देणार की, ३५० खासदार निवडून येणाऱ्या पक्षाला मतदान करणार?, असा सवाल पंकजा मुंडेंनी मेळाव्यात उपस्थितांना केला. संदीपान भुमरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या प्रचाराला पंकजाताई जातात, मग बीडमध्ये मला मतदान करणार नाहीत का? असेही त्यांनी म्हटले.   (Pankaja Munde)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : वीर सावरकर यांचं नाव घेण्याची हिंमत तुमच्यात आहे का? अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल)

जातीसाठी माती खाऊ नका – पंकजा मुंडे 

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जातीपातीचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दिशा ठरवणारे केंद्रस्थळ म्हणून बीडकडे पाहिले जाते. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष दिसून येत आहे. या संघर्षावर बोलताना, जातीसाठी माती खायची नाही, मातीसाठी जात संपुष्टात आणायची आहे, असे म्हणत पंकजा यांनी केवळ जातीचा उमेदवार म्हणून मतदान करू नका, असे आवाहनही केले. सगळे पक्ष आता एकत्र झाले आहेत, कामाला लागा मला दिल्लीला पाठवून सन्मानित करा, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले.  (Pankaja Munde)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.