BMC : मुंबईतील नाल्यातून पावसाळापूर्व गाळ काढण्यासाठी अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमा; महापालिका आयुक्तांचे निर्देश

782
BMC : मुंबईतील नाल्यातून पावसाळापूर्व गाळ काढण्यासाठी अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमा; महापालिका आयुक्तांचे निर्देश

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करावीत. रेल्‍वे, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांसह विविध विभागांशी योग्‍य समन्‍वय साधून पावसाळ्यापूर्वी म्हणजे ५ जून २०२४ पर्यंतच्‍या विहित मुदतीत नाल्‍यातील गाळ काढण्‍याची कामे पूर्णत्‍वाकडे न्‍यावीत. आवश्यक तेथे अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा, असे स्‍पष्‍ट निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले. परिमंडळाचे उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त यांनी दररोज सकाळ, सायंकाळी विभागात प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळी भेटी देऊन पाहणी करावी. पाणी साचण्‍याच्‍या ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करून पाण्‍याचा जलद गतीने निचरा होण्‍याकामी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आखाव्‍यात जेणेकरून मुंबईकर नागरिकांना पावसाळ्यात निर्धोक राहता येईल, असे देखील आयुक्‍तांनी नमूद केले. (BMC)

यंदाच्‍या पावसाळयाच्‍या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील नाल्‍यांतून गाळ काढण्‍याच्‍या कामांची आढावा बैठक महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली २१ मे २०२४ रोजी महानगरपालिका मुख्‍यालयात संपन्‍न झाली. महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्‍त आयुक्‍त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्‍त (महानगरपालिका आयुक्‍तांचे कार्यालय) चंद्रशेखर चोरे, सर्व परिमंडळांचे उप आयुक्‍त, प्रमुख अभियंता (पर्जन्‍य जलवाहिन्‍या) श्रीधर चौधरी यांच्‍यासह संबंधित विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. (BMC)

(हेही वाचा – Deepak Kesarkar: दहावीचा निकाल कधी जाहीर होणार? दीपक केसरकर यांनी दिले उत्तर)

नाल्‍यातून गाळ उपशाची कामे जलद गतीने

महानगरपालिका आयुक्‍त भूषण गगराणी म्‍हणाले की, मुंबईतील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तिन्ही विभागांमध्ये नाल्‍यातून गाळ उपशाची कामे जलद गतीने करण्यात येत आहेत. नाल्यांमधून उद्दिष्टाएवढे किंवा त्याहूनही अधिक गाळ काढण्याचे काम ५ जून २०२४ अखेरपर्यंत पूर्ण करावे. निश्चित मुदतीत ही कामे पूर्ण होतील, त्यादृष्टीने नियोजन करून संपूर्ण यंत्रणेने कार्यवाहीला वेग द्यावा. (BMC)

रहिवाशांकडून नाल्‍यात मोठ्या प्रमाणात कचरा

नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी मदत मिळते. ही गाळ काढण्याची कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्‍या उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त यांनी प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळी भेट द्यावी, असे स्‍पष्‍ट करतानाच आयुक्‍त म्‍हणाले की, नाल्‍यालगतच्‍या रहिवाशांकडून नाल्‍यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्‍याच्‍या तक्रारी असल्‍या तरी तरीदेखील तरंगत्‍या कचऱ्याची (फ्लोटींग मटेरियल) योग्‍यप्रकारे विल्‍हेवाट लावावी. (BMC)

नाल्‍यातून गाळ उपसा कामाची पाहणी

नाले तुंबता कामा नये याची दक्षता घेतानाच तरंगत्‍या कचऱ्याची योग्‍य प्रकारे विल्‍हेवाट लावावी. अरूंद नाल्‍याच्‍या ठिकाणी ‘ट्रॅश बूम’ चा वापर करावा. स्‍थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींशी संवाद साधून त्‍यांचा सहयोग घ्‍यावा. महानगरपालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाल्‍यातून गाळ उपसा कामाची पाहणी करावी, असेही गगराणी यांनी नमूद केले. (BMC)

गाळ काढण्यासह कल्व्हर्ट स्वच्छता

पावसाळापूर्व उपाययोजनांसाठी करण्यात येत असलेल्या कामांमध्ये नाल्यांमधील गाळ काढण्यासह नाल्यांचे रुंदीकरण, रेल्वे रुळाखालील व इतर ठिकाणी देखील बंदिस्त प्रवाह मार्गांची (कल्व्हर्ट) स्वच्छता करणे, ही कामेही समाविष्ट आहेत. रेल्वे प्रशासनासमवेत समन्‍वय साधून रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळ्या नाल्यांमधून गाळ काढण्यासह कल्व्हर्ट स्वच्छता कामांची पाहणी करावी. विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावावेत, मुंबई महानगरात पाणी साचू नये, त्‍याचा जलद गतीने निचरा व्‍हावा यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आखाव्‍यात, असेही निर्देश आयुक्‍त भूषण गगराणी यांनी दिले. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.