एकच ईश्वर म्हणणारी ’मानव धर्म सभा’ काय आहे? कोण होते Durgaram Mehta?

232

दुर्गाराम मंचाराम दवे हे गुजरातचे समाजसुधारक होते. त्यांनी १८४४ रोजी सुरतमध्ये ’मानव धर्म सभा’ची स्थापना केली होती. दुर्गाराम (Durgaram Mehta) यांचा जन्म २५ डिसेंबर १८०९ रोजी सुरत येथे वडनागर नगर येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. ते अकरा वर्षांचे असताना त्यांची आई नानीगौरी यांचे निधन झाले आणि त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांच्या मावशीने केले. माय मरो पण मावशी जगो ही म्हण त्यांच्या बाबतीत खरी ठरली.

दुर्गाराम दवे यांना दुर्गाराम मेहता (Durgaram Mehta) किंवा दुर्गाराम मेहताजी म्हटले जाते. त्यांची बुद्धिमत्ता तीव्र होती. विशेष म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी ते वीस पर्यंत पाढे म्हणत होते. वयाच्या बाराव्या वर्षी ते स्थानिक फर्ममध्ये अत्यंत कमी पगारावर नोकरीला लागले. त्यांना पुस्तके वाचायला आवडायची. १८२५ मध्ये ते आपल्या मावशीसोबत मुंबईला गेले आणि ते सरकारी गुजराती शाळेत सहा महिने मोफत शिकवू लागले आणि त्यांना कळलं की ते आता शाळा सांभाळू शकतात.

(हेही वाचा Ajit Pawar : मी ६० वर्षांचा झाल्यावर भूमिका घेतली, काहींनी ३८व्या वर्षी घेतली; अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांवर केली टीका)

हा अनुभव पाठीशी घेऊन ते १८२ मध्ये पुन्हा सुरतमध्ये आले आणि त्यांनी सरकारच्या वतीने गुजराती शाळा सुरु केली. तेव्हा त्यांन अमहिन्याला २० रुपये पगार मिळत होता. दुर्गाराम हे गुजरातमधील सामाजिक सुधारणेचे प्रणेते मानले जातात. त्यांनी विधवा पुनर्विवाहाची चळवळ चालवली. समाजातील सनातनी वर्गाच्या तीव्र विरोधाला न जुमानता, त्यांनी अशा सुधारणेच्या कार्याला पाठिंबा दिला.

दुर्गाराम यांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे ’मानव धर्म सभा. हिंदूंमध्ये अनेक पंथ आणि संप्रदाय आहेत. त्यांचं म्हणणं होतं की देव एकच आहे आणि धर्म सुद्धा एकच आहे. एकेश्वरवादाची चळवळ सुरु करण्यासाठी त्यांनी मानध धर्म सभेची स्थापना केली. ते दादोबा पांडुरंग यांच्या विचाराने प्रेरित होते. त्यांच्या विचारांनुसार त्यांनी या संस्थेची स्थापना केली. ही गुजरातमधील पहिली सुधारणा संघटना मानली जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.