गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि गतीचा सिद्धा मांडणारा Isaac Newton

153
आयझॅक न्यूटन (Isaac Newton) हे एक महान गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होते. न्यूटन हे नाव सर्वपरिचित आहे. जगातला कोणताही माणूस सांगू शकतो की न्यूटन कोण आहे. न्यूटनच्या सिद्धांतांनी जगाला नव्या पद्धतीने पाहण्याचा मार्ग दाखवला त्याचबरोबर त्यांनी आधुनिक भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा पाया घातला. न्यूटन हे इंग्लंडचे शास्त्रज्ञ होते. त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि गतीचा सिद्धांत मांडला.
न्यूटन (Isaac Newton) यांनी सार्वभौमिक गुरुत्वाकर्षण आणि गतीच्या तीन नियमांचे वर्णन केले आहे. न्यूटनने दाखवून दिले की पृथ्वीवरील वस्तूंची गती आणि खगोलीय पिंडांची हालचाल या नैसर्गिक नियमांच्या समान संचाद्वारे नियंत्रित होतात. हे दाखवण्यासाठी त्यांनी केप्लरचे ग्रहांच्या गतीचे नियम आणि त्यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामध्ये सातत्य प्रस्थापित केले.

त्यांनी खालीलप्रमाणे तीन नियमांद्वारे वैज्ञानिक तर्कशास्त्राचा पाया रचला: 

  • कोणत्याही नैसर्गिक घटनेमागे एकच आणि केवळ एकच खरे कारण असते.
  • एका प्रकारच्या घटनांसाठी एकच प्रकारचे कारणे असते.
  • वस्तूंचे गुणधर्म सर्वत्र सारखेच असतात.
  • एखाद्या घटनेवरून काढलेले निष्कर्ष तोपर्यंत खरे मानले पाहिजे, जोपर्यंत इतर घटनांद्वारे ते चुकीचे सिद्ध होत नाही.
न्यूटन यांच्या मते सफेद प्रकाश हा अनेक रंगांच्या प्रकाशाचे मिश्रण असतो आणि प्रकाश हा अतिशय सूक्ष्म कणांचा वेगवान प्रवाह असतो. तथापि, ह्युजेन्स आणि इतर शास्त्रज्ञांनी कण सिद्धांत नाकारला आणि लहरी सिद्धांतावर जोर दिला. मात्र न्यूटनने विज्ञानाचा पाया रचला असे म्हटले तरी वावगे ठरु नये. आज २५ डिसेंबर म्हणजे न्यूटनचा जन्मदिन. त्यांचा जन्म २५ डिसेम्बर १६४२ रोजी झाला. हा महान शास्त्रज्ञाला मानाचा मुजरा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.