Vijay Wadettivar : विजय वडेट्टीवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया; म्हणाले, हा २६/११ च्या हल्ल्यातील मृतांचा अनादर

आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

150

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी निरधारा आरोप केले असून याबद्दल मला वाईट वाटते. यामुळे पाकिस्तान सरकारला फायदा होऊ शकतो. ते असे दावे कशाच्या आधारे करत आहेत हे मला माहीत नाही. राजकारणात गुंतून तुम्ही आमच्या देशाची प्रतिमा मलिन करत आहात याचं आश्चर्य वाटतं. असे आरोप करून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे २६/११ च्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचा अनादर करत आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपाचे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उज्जल निकम यांनी दिली.

आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे, असे विधान राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उज्ज्वल निकम यांना भाजपाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. दरम्यान, वडेट्टीवारांच्या (Vijay Wadettivar) या वक्तव्यानंतर उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यांना माझ्या उमेदवारीची भीती वाटते ते अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत. फाशीपूर्वी कसाबने एका न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर कबूल केले होते की मुंबई हल्ल्याच्या वेळी त्याने आणि लष्कर-ए-तैयबाचे भरती इस्माईल खान यांनी पोलिस जीपवर अंदाधुंद गोळीबार केला होता, ज्यामुळे करकरे आणि पोलीस पथकातील इतर दोघांचा मृत्यू झाला होता, असे वकील उज्ज्वल निकम म्हणाले.

(हेही वाचा Pakistan : पाकचे माजी मंत्री फवादकडून राहुल गांधीचे कौतुक, तर वडेट्टीवारांकडून कसाब आणि पाकिस्तानला क्लीनचीट )

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे, असे विधान वडेट्टीवार यांनी केले. त्यानंतर पुन्हा या विधानावर स्पष्टीकरण देताना वडेट्टीवार म्हणाले, आपण हे एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन बोललो आहे. यामध्ये मी काहीही म्हटले नसून विलासराव देशमुख त्यावेळी म्हणाले होते की, कसाबला फाशी झाली म्हणजे श्रेय घेण्याची गरज नाही. कारण कसाब दहशतवादी होता, त्याला फाशी होणारच होती. त्यामुळे बडेजावपणा दाखवायची गरज नाही. मी एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला असून याबाबत त्यांना (उज्वल निकम यांना) काही खुलासा करायचा असेल तर त्यांनी करावा, असे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.