Pakistan : पाकचे माजी मंत्री फवादकडून राहुल गांधींचे कौतुक, तर वडेट्टीवारांकडून कसाब आणि पाकिस्तानला क्लीनचीट 

321

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना यात आता पाकिस्तानने (Pakistan) उडी घेतली आहे. पाकिस्तानचा माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी भारतात राहुल गांधी जिंकावेत, मोदी हरावेत, यासाठी ट्विट केले, तसेच राहुल गांधींच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल केला मात्त्व, मात्र त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसचे विधानसभा विरोधु पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई हल्ल्यातील पोलीस अधिकार हेमंत करकरे यांच्यावर झाडलेली गोळी हे कसाबच्या बंदुकीतील नव्हे तर संघाच्या कार्यकर्त्याच्या बंदुकीतून झाडण्यात आली असे म्हटल्याने गदारोळ माजला आहे.

(हेही वाचा Hindutva Leaders : भाजपा आमदार राजा सिंह, नुपूर शर्मा, सुरेश चव्हाणके यांच्या हत्येचा कट रचणारा मौलवी गजाआड; सुरत गुन्हे शाखेची कारवाई)

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी वरिष्ठ वकील आणि भाजपचे उत्तर मध्य मतदार संघाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना देशद्रोही ठरवताना पाकिस्तान (Pakistan) आणि दहशतवादी अजमल कसाब यांना मुंबई हल्ल्यातून क्लीन चीट दिली. पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी दहशतवादी अजमल कसाब किंवा अन्य कुठल्या दहशतवाद्यांच्या बंदुकीतली नव्हती, तर संघ समर्पित एका पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीतली होती आणि त्याचे पुरावे उज्ज्वल निकम यांनी लपवले त्यामुळे ते देशद्रोही ठरतात. अशा देशद्रोही व्यक्तीला लोकसभा निवडणुकीतले तिकीट देऊन भाजप देशद्रोहाला चिथावणी देतो आहे का?, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.

पण आपण आपल्या वक्तव्यातून उज्ज्वल निकम यांच्यासारख्या वरिष्ठ वकिलाला देशद्रोही ठरवतो आहोत, पण त्याचवेळी पाकिस्तान सारख्या दहशतवादी राष्ट्राला आणि अजमल कसाब सारख्या मुंबई हल्ल्यातल्या दहशतवाद्याला क्लीन चीट देत आहोत, याचे भानही विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला राहिले नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.