देशातील विविध परीक्षांच्या घोटाळ्यांचे वादळ अद्याप संपलेले नाही. दरम्यान ओडिशामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओडिशा आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे (OUHS) आयोजित करण्यात आलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय (MD/MS) अभ्यासक्रमाच्या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. २७ जुलैला झालेल्या सर्वसाधारण शल्यचिकित्सा (General Surgery) विषयाच्या परीक्षेदरम्यान हा प्रकार घडला. परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच ही प्रश्नपत्रिका इंटरनेटवर उपलब्ध होऊ लागल्याने खळबळ उडाली असून शिक्षण वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे. (Odisha Medical Pepar Leak)
(हेही वाचा – अमली पदार्थ तस्करांशी लढणाऱ्या ‘ANTF’च्या खात्यात ३० टक्के प्रोत्साहन भत्ता)
‘व्हॉट्सॲप’ ग्रुपवरून प्रश्न आणि उत्तरे प्रसारित
भुवनेश्वर येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याला या प्रश्नपत्रिकेची छायाचित्रे मिळाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. संशयित आरोपानुसार, बेर्हामपूर येथील ‘एमकेसीजी’ (MKCG) वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याने तयार केलेल्या भ्रमणध्वनी समूहावर ही छायाचित्रे पाठवण्यात आली होती. इतकेच नव्हे तर, परीक्षा सुरू असतानाच काही विशिष्ट भ्रमणध्वनी क्रमांकांवरून प्रश्नांची उत्तरे देखील विद्यार्थ्यांना पुरवली जात असल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. (Odisha PG Medical Leak )
(हेही वाचा – Fraud : अमिताभ बच्चन यांच्यासोबत जाहिरातीचे आमिष; तरुणाची ४७ हजारांची फसवणूक)
प्रशासनाचा तपास आणि सुरक्षा वाढवण्याचा निर्णय
या प्रकरणाची गंभीर दखल घेत विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्राचार्यांची तातडीने एक आभासी बैठक बोलावली. महाविद्यालयाच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हा पारंपारिक अर्थाने परीक्षा सुरू होण्यापूर्वीचा गुप्तता भंग (Leak) नसून, परीक्षा कक्षातून प्रश्नपत्रिका बाहेर पाठवण्याचा प्रकार आहे. या प्रकरणी सखोल अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असून, पुढील परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. परीक्षा रद्द करण्याबाबतचा अंतिम निर्णय तपास पूर्ण झाल्यानंतरच घेतला जाईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

