-
प्रतिनिधी
ANTF संघटित अमली पदार्थ तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी अहोरात्र जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या (ANTF) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या विशेष पथकातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे अतिधोकादायक स्वरूप लक्षात घेऊन, सरकारने त्यांना मूळ वेतनाच्या ३० टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा केली आहे. हा भत्ता १ ऑगस्टपासून लागू होणार असून, त्यासाठी शासनाकडून ५.९ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. (ANTF)
(हेही वाचा – Suvendu Adhikari दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? Jaish-e-Mohammed च्या सदस्याला अटक; एसटीएफची कारवाई)
अमली पदार्थांचे आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय जाळे, संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करणे तसेच केंद्रीय यंत्रणांशी समन्वय साधत अत्यंत आव्हानात्मक कारवाया करणाऱ्या ‘ANTF’मध्ये सक्षम व कार्यक्षम अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने आकर्षित व्हावेत, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. अनियमित कामाची वेळ, चोवीस तास पाळत ठेवणे, सराईत गुन्हेगारांशी सततचा संबंध आणि उच्च दाबाखालील तपासांमुळे अधिकाऱ्यांवर येणारा मानसिक ताण या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. (ANTF)
दरम्यान, या विशेष युनिटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा भत्ता मोठा आर्थिक दिलासा ठरणार असला, तरी मूळ संवर्गात परत गेल्यानंतर हा भत्ता बंद होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कठोर कायदेशीर तरतुदी, जप्त केलेल्या मुद्यामाची सुरक्षितता राखण्याचे आव्हान आणि तपासादरम्यान होणारी कडक छाननी या सर्व आव्हानांचा सामना करणाऱ्या ‘ANTF’ जवानांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. (ANTF)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

