अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) सध्या राज्यभरात नियमबाह्य कॅटीन विरोधात धडक तपासणी मोहीम उघडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईबाबत विचारणा केल्यानंतर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आता आपला मोर्चा थेट शैक्षणिक संस्था आणि सरकारी आस्थापनांकडे वळवला आहे. या मोहिमेअंतर्गत अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (SGBAU) आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुख्य उपाहारगृहांवर अचानक छापे टाकण्यात आले. तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळून आल्याने दोन्ही उपाहारगृहे तातडीने सील करण्यात आली आहेत. (Tukaram Mundhe FDA Action)
(हेही वाचा – ITR Filing Deadline Today : आयटीआरची अंतिम मुदत चुकवणे म्हणजे ‘हिट विकेट’; आयकर विभागाचे ‘फ्री हिट’ फायलिंगचे आवाहन)
अस्वच्छता आणि परवान्याचा अभाव
अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अमरावती विद्यापीठ आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कँटीनमध्ये धाड टाकली. या पाहणीदरम्यान उपाहारगृहांमध्ये प्रचंड अस्वच्छता असल्याचे दिसून आले. तसेच, ही दोन्ही कँटीन कोणत्याही अधिकृत अन्न सुरक्षा परवान्याशिवाय (FSSAI License) बेकायदेशीरपणे चालवली जात असल्याचे उघडकीस आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलत दोन्ही उपाहारगृहांना टाळे ठोकले असून कुलसचिवांना यासंदर्भात अधिकृत पत्र पाठवले आहे. (Tukaram Mundhe FDA Action)
(हेही वाचा – Vaibhav Sooryavanshi : सूर्यवंशीला उपकप्तान का केलं, निवड समिती सदस्यानेच केलं स्पष्ट)
मुंबई उच्च न्यायालयाची कानउघडणी आणि मंत्रालयातील तपासणी
नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलवर केलेल्या कारवाईच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला फटकारले होते. केवळ खासगी उपाहारगृहांवर कारवाई न करता सरकारी कार्यालये, कँटीन आणि मंत्रालयातील उपाहारगृहांचीही समान रीतीने तपासणी झाली पाहिजे, असे ताशेरे न्यायालयाने ओढले होते. न्यायालयाच्या या निर्देशानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयातील आणि विधीमंडळातील कँटीनची पुन्हा सखोल तपासणी केली. त्यानंतर आता राज्यातील सर्व प्रमुख शासकीय संस्था, शाळा व विद्यापीठांच्या कँटीनची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community


