Hindusthan Post Impact : केडीएमटी प्रशासनाला जाग; डोंबिवलीत बस फेऱ्या वाढणार, ब्रेकडाऊन बसेसची तातडीने दुरुस्ती

62
KDMT bus service issues in Dombivli highlighted by Hindusthan Post.
Hindusthan Post Impact : केडीएमटी प्रशासनाला जाग; डोंबिवलीत बस फेऱ्या वाढणार, ब्रेकडाऊन बसेसची तातडीने दुरुस्ती
  • कल्याण, प्रतिनिधी

Hindusthan Post Impact            हिंदुस्थान पोस्टने लागोपाठ दोन दिवस सचित्र वृत्तांच्या माध्यमातून हैराण झालेल्या प्रवाशांच्या भावना मांडल्या होत्या. मंगळवारी २८ जुलै रोजी ‘तासन् तास बस नाही, आलेली बसही डेपोकडे निघाली : डोंबिवलीत केडीएमटीच्या विचित्र सेवेबद्दल प्रवाशांत संतापाचे वातावरण’ या मथळ्याखाली आणि बुधवारी २९ जुलै रोजी ‘केडीएमटीच्या डोंबिवलीतील बाजीप्रभू चौक बस स्थानकाचा कोंडमारा : अनियमित बससेवेमुळे प्रवासी हैराण’ या मथळ्याखाली सलग दोन दिवस हिंदुस्थान पोस्टने सचित्र वृत्त प्रसारित केले होते. या दोन्ही वृत्तांची गंभीर दखल कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाने घेतली आहे. (Hindusthan Post Impact)

(हेही वाचा – तासन् तास बस नाही, आलेली बसही डेपोकडे निघाली; डोंबिवलीत KDMT च्या विचित्र सेवेबद्दल प्रवाशांत संतापाचे वातावरण)

डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील बस थांब्यावर एक तास केडीएमटी बस न आल्याने तरूणाचा संताप आणि स्टेशन परिसरातील बाजीप्रभू चौकात असलेल्या मुख्य बस स्थानकावरील गैरसोयी व अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त असल्याबाबत हिंदुस्थान पोस्टने लागोपाठ दोन दिवस सचित्र वृत्तांच्या माध्यमातून त्रस्त झालेल्या प्रवाशांच्या भावना मांडल्या होत्या. या वृत्तांची केडीएमटी प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार द्वासे यांनी कार्यशाळेत बैठक घेऊन संबंधितांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कित्येक दिवसांपासून ब्रेक डाऊन आणि इतर दुरूस्तीअभावी उभ्या असलेल्या बसेसची तातडीने दुरूस्ती करून त्या प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच कंत्राटी पद्धतीने चालक भरतीची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, असे निर्देश डॉ. द्वासे यांनी दिले आहेत. (Hindusthan Post Impact)

(हेही वाचा – KDMT च्या डोंबिवलीतील बाजीप्रभू चौक बस स्थानकाचा कोंडमारा; अनियमित बससेवेमुळे प्रवासी हैराण)

याशिवाय बस थांब्यांवरील अनधिकृत फेरीवाले, टपरीवाले आणि अवैध रिक्षा पार्किंग या समस्यांबाबत केडीएमसीच्या संबंधित फेरीवाला हटाव पथकासह आरटीओ आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेला केडीएमटीकडून यापूर्वी पत्रे देण्यात आली होती. आता त्याची स्मरण पत्रे पुन्हा पाठविण्यात येणार असल्याची माहिती केडीएमटी अधिकाऱ्यांनी दिली. या सर्व उपाययोजनांमुळे येत्या काही दिवसांत स्टेशन-निवासी-स्टेशन अशा बस फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. शिवाय बस थांब्यांवरील भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या प्रवाशांसह केडीएमटी प्रशासन आणि हिंदुस्थान पोस्टचे एमआयडीसी प्रवासी संघटनेच्या वतीने या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी आभार मानले आहेत. (Hindusthan Post Impact)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.