Defence Security Corps: जवानाने २० जिवंत काडतुसांची मॅगझिन घेऊन ड्युटी पॉईंट सोडला, पोलिसांना पीसीआर कॉल केल्याने खळबळ

15

Defence Security Corps: आया नगर येथील एअर फोर्स स्टेशनवर असलेल्या एका ४६ वर्षीय डिफेन्स सिक्युरिटी कोअर (डीएससी) जवानाने २० जिवंत काडतुसांची मॅगझिन सोबत घेऊन आपली ड्युटी सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पोलिसांना पीसीआर कॉल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.

ही घटना मंगळवारी घडली. एअर फोर्स स्टेशनवर तैनात असलेला हा कॉन्स्टेबल संध्याकाळी सुमारे ७:५०च्या सुमारास आपल्या ड्युटीच्या ठिकाणाहून निघून गेला आणि रात्री साधारण ९:२५ वाजता परत आला. परत आल्यावर त्याने काडतुसांनी भरलेली ती मॅगझिन आपल्या ठरलेल्या ड्युटी पॉईंटवर जमा केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त (दक्षिण) अनंत मित्तल यांनी दिली.

हेही वाचा – Inflation Rate Statistics: कांदे-बटाटे महागले, महागाईच्या दराने उच्चांक गाठला; केंद्र सरकारकडून महागाई दराची आकडेवारी जाहीर

चौकशीदरम्यान त्याने दारू पिऊन ड्युटी वेळेआधीच सोडल्याचे समोर आले, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी संबंधित विभागाकडून योग्य ती कारवाई केली जात आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.