Suvendu Adhikari दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? Jaish-e-Mohammed च्या सदस्याला अटक; एसटीएफची कारवाई

Suvendu Adhikari दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? Jaish-e-Mohammed च्या सदस्याला अटक; एसटीएफची कारवाई

74
Suvendu Adhikari
Suvendu Adhikari

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी दहशतवादी संघटनांच्या रडारवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील वर्धमान भागातून पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड सज्जाद भट याचा निकटवर्तीय असणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल एसटीएफने गुरुवारी रात्री ही कारवाई केली आहे.(Suvendu Adhikari)

(हेही वाचा : Donald Trump Hamas Deal : गाझा पट्टीत युद्ध समाप्त झाल्याचा ट्रम्प यांचा दावा)

मिळालेल्या माहितीनुसार, एसटीएफने पश्चिम बंगालमधील वर्धमान येथून बंदी घातलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा सदस्य हमीद मंडल याला अटक केली आहे. या दहशतवाद्याने मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखली होती, असा संशय एसटीएफने व्यक्त केला आहे. दहशतवाद्याकडून जप्त केलेल्या मोबाइल आणि कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ही माहिती उघडकीस आली आहे.(Suvendu Adhikari)

(हेही वाचा : भाजपचे प्रवक्ते Shehzad Poonawala यांचे राजकीय निवृत्तीचे संकेत? एक्सवरील बायो बदलल्यानं चर्चा; काय लिहिलंय?)

अटक करण्यात आलेला जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी हमीद मंडल हा जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार सज्जाद भटचा जवळचा साथीदार आहे. या दहशतवाद्याला वर्धमान रेनेसान्स टाऊनशिप परिसरातील एका फ्लॅटमधून अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला दहशतवादी हमीद मंडल गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून याच परिसरातील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. एसटीएफ सध्या या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपीचे नेटवर्क, संपर्क आणि कथित कारवायांची तपासणी करत आहे. शुक्रवारी त्याला वर्धमान न्यायालयात हजर केले जाणार असून एसटीएफ त्याची कोठडी मागण्याची शक्यता आहे.(Suvendu Adhikari)

हेही पाहा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.