ST Bus Accident:सुपे (ता.बारामती) येथील घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आठ विद्यार्थी जखमी झाले. तर दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. बुधवारी (ता.१६) सकाळी आठच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटीचे वाहकही या अपघातात जखमी झाले असून ते उपचार घेत आहेत.
अपघातस्थळाला विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. जखमींची विचारपूस करून पालकांना धीर दिला. दरम्यान, अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार यांनी अपघात स्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे.
हेही वाचा – Shivsena कोणाची? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी; शिंदेंच्या वकिलांच्या युक्तिवादाने प्रकरणात नवा ट्विस्ट
मला स्पोर्ट शूज घ्यायचे असल्याने वडिलांकडे मी हट्ट धरला. त्यामुळे बसमधून न येता दुचाकीवरून निघाल्याने अपघातातून वाचलो. अशी प्रतिक्रिया साईराज सुनिल चोरमले या विद्यार्थ्याने व्यक्त केली.
हेही पहा –


