Xi Jinping यांची प्रकृती बिघडली; लष्करी रुग्णालयात दाखल

प्रकृती अस्वास्थ्यामुळेच Xi Jinping यांनी आपला भारत दौरा नियोजित वेळेपूर्वीच आटोपता घेतला, असा दावा वानजुन यांनी केला आहे.

12
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या प्रकृतीबाबत सध्या आंतरराष्ट्रीय वर्तुळात एक खळबळजनक दावा केला जात आहे. भारतात आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेवरून बीजिंगमध्ये परतताच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
चिनी लोकशाही पक्षाचे अध्यक्ष जी वानजुन यांनी म्हटल्याप्रमाणे बीजिंग विमानतळावर उतरताच जिनपिंग  (Xi Jinping)  यांना लष्करी हेलिकॉप्टरद्वारे तातडीने ‘बीजिंग ३०१ रुग्णालयात’ नेण्यात आले. नेहमीप्रमाणे विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी कोणतेही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते. जिनपिंग (Xi Jinping) यांची प्रकृती केवळ बीजिंगमध्येच नव्हे, तर दिल्लीतील ब्रिक्स परिषदेदरम्यानही बिघडली होती. तेथे त्यांच्या वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले होते.

(हेही वाचा Disha Salian मृत्यू प्रकरणात CBIचा अखेर FIR; संशयितांची यादी मोठी, पण आरोपींच्या कॉलममध्ये एकही नाव नाही!)

प्रकृती अस्वास्थ्यामुळेच त्यांनी आपला भारत दौरा नियोजित वेळेपूर्वीच आटोपता घेतला, असा दावा वानजुन यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जिनपिंग  (Xi Jinping)    यांची द्विपक्षीय चर्चा पार पडली असली, तरी मोदींनी आयोजित केलेल्या विशेष ‘गाला डिनर’ला जिनपिंग गैरहजर राहिले होते. त्यावेळी त्यांच्या अनुपस्थितीचे कारण स्पष्ट करण्यात आले नव्हते. सुमारे सात वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा पहिलाच भारत दौरा होता; यापूर्वी ते ऑक्टोबर २०१९ मध्ये महाबलीपुरम शिखर परिषदेसाठी आले होते.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर चीन सरकार, संबंधित रुग्णालय किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय अधिकृत संस्थेने अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे या दाव्यांची सत्यता अद्याप अस्पष्ट असली, तरी जागतिक राजकारणात आणि सोशल मीडियावर यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. (Xi Jinping)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.