‘Shivtirth’वर रंगलेल्या बाप्पाच्या उत्सवात अशी कोणती गोष्ट खटकली; ज्यामुळे राज्याच्या २ सर्वोच्च नेत्यांनी तिथे पाऊल ठेवणेच टाळले?

1
'Shivtirth'वर रंगलेल्या बाप्पाच्या उत्सवात अशी कोणती गोष्ट खटकली; ज्यामुळे राज्याच्या २ सर्वोच्च नेत्यांनी तिथे पाऊल ठेवणेच टाळले?
  • प्रतिनिधी

Shivtirth                गणेशोत्सवाचा काळ म्हणजे महाराष्ट्राच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनात कटुता विसरून परस्परांच्या घरी जाण्याचा, सलोखा जपण्याचा काळ मानला जातो. मुंबईत दादर येथील ‘शिवतीर्थ’ हे निवासस्थान तर गेल्या काही वर्षांत राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील सर्वात मोठे आकर्षण केंद्र बनले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या घरी विराजमान होणाऱ्या दीड दिवसांच्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी यंदाही दिग्गज मंडळींची अलोट गर्दी पाहायला मिळाली. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यापासून ते कला आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत अनेकांनी आवर्जून हजेरी लावत बाप्पाचे दर्शन घेतले आणि ‘शिवतीर्थ’वर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. (Shivtirth)

(हेही वाचा – Mumbai Crime : कुंपणच शेत खातंय! ड्रग्ज सापडलेल्या प्रवाशाकडून पैसे घेतले अन् सोडून दिलं; दोन GRP कॉन्स्टेबल निलंबित)

दरवर्षी राज ठाकरेंच्या घरच्या गणपतीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक पक्षांचे नेते पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येताना दिसतात. यंदाही अनेक राजकीय नेत्यांची पावले ‘शिवतीर्थ’कडे वळली खरी; परंतु राजकीय विश्लेषक आणि उपस्थितांच्या नजरा ज्या दोन अतिमहत्त्वाच्या चेहऱ्यांना शोधत होत्या, त्यांची झालेली अनपेक्षित गैरहजेरी सर्वांच्याच भुवया उंचावणारी ठरली. राज्यातील सत्तासूत्रे ज्यांच्या हाती आहेत, त्या प्रमुख नेत्यांनी ऐन उत्सवाच्या काळात राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणे का टाळले, याबद्दल संपूर्ण राजकीय वर्तुळात दिवसभर तर्कवितर्कांना उधाण आले होते. (Shivtirth)

(हेही वाचा – ST Bus Accident: सुपे घाटात एसटी बस उलटली, ८ विद्यार्थी जखमी; दोघांची प्रकृती गंभीर)

या संपूर्ण प्रकरणामागचे गूढ आता उलगडले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणीवपूर्वक ‘शिवतीर्थ’वर बाप्पाच्या दर्शनाला जाणे टाळल्याची माहिती समोर आली आहे. या नाराजीमागे नुकत्याच घडलेल्या दोन मोठ्या घटना कारणीभूत ठरल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी पुण्याच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापकांच्या कार्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवण्यास लावला होता; तर दुसरीकडे स्वतः राज ठाकरे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीकास्त्र सोडले होते. भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वावर झालेली ही टीका आणि पंतप्रधान मोदींचा फोटो हटवण्याचा प्रकार महायुतीमधील नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. याच तीव्र नाराजीतून मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे या दोघांनीही यंदा राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पांच्या दर्शनाला पाठ फिरवल्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.(Shivtirth)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.