Mahayuti : पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी ती ‘अदृश्य शक्ती’ नेमकी कोण; कोणाच्या इशाऱ्यावर महायुतीतच उडालाय भडका?

16
Mahayuti : पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी ती 'अदृश्य शक्ती' नेमकी कोण; कोणाच्या इशाऱ्यावर महायुतीतच उडालाय भडका?
  • प्रतिनिधी

Mahayuti               पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्यांचे निर्विवाद वर्चस्व मानले जाते, त्या कोल्हापूर आणि सांगली पट्ट्यात सध्या सत्तेच्या समीकरणांना प्रचंड हादरे बसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांच्या निवडणुका आणि पदवीधर मतदारसंघावरून महायुतीमधील घटक पक्षांमध्ये उडालेला धुरळा आता चव्हाट्यावर आला आहे. वरवर पाहता सत्तेत एकत्र असणारे पक्ष आतून मात्र एकमेकांचे पंख छाटण्याच्या तयारीत असून पडद्यामागे मोठ्या हालचालींना वेग आला आहे. सहकारी संस्थांमधील सत्ता टिकवण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नसून, या रस्सीखेचाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. (Mahayuti)

(हेही वाचा – Mumbai Crime : कुंपणच शेत खातंय! ड्रग्ज सापडलेल्या प्रवाशाकडून पैसे घेतले अन् सोडून दिलं; दोन GRP कॉन्स्टेबल निलंबित)

या अंतर्गत संघर्षाला खरी धार मिळाली ती सहकारातील मातब्बर केंद्र असलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या राजकारणामुळे. गोकुळमधील अवसायानातील संस्थांच्या अपात्रतेचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली. या सर्व घडामोडींमागे एक ‘अदृश्य शक्ती’ कार्यरत असल्याचा थेट दावा समोर आल्याने राजकीय वातावरण तापले. या तथाकथित अदृश्य शक्तीच्या माध्यमातून आपल्याच मित्रपक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय बळावला असून, या डावपेचांना शह देण्यासाठी आता रणनीती आखली जात आहे. (Mahayuti)

(हेही वाचा – ST Bus Accident: सुपे घाटात एसटी बस उलटली, ८ विद्यार्थी जखमी; दोघांची प्रकृती गंभीर)

या संपूर्ण राजकीय पटावर सर्वात मोठा स्फोट ठरला आहे तो म्हणजे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट मित्रपक्ष भाजपाविरोधात दंड थोपटत सवता सुभा मांडण्याची केलेली तयारी. पुणे पदवीधर मतदारसंघावरून भाजपाशी थेट टक्कर घेत मुश्रीफांनी उमेदवारी जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीत भाजपा आणि महाडिक गटाला पूर्णपणे बाजूला ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती या तीन पक्षांकडेच तब्बल ३,५०० ठराव असल्याचा दावा मुश्रीफांनी ठोकला आहे. ‘गोकुळमध्ये भाजपाची आम्हाला अजिबात गरज नाही’, असा थेट आणि आक्रमक संदेश देत मुश्रीफांनी भाजपाला खुले आव्हान दिले असून, कोल्हापूर आणि सांगलीच्या राजकारणात भाजपाला वगळून स्वतंत्र महायुती उभारण्याचा हा नवा डाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Mahayuti)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.