दिल्ली दंगलीची ‘ती’ काळी रात्र; हत्या झालेल्या आयबी अधिकारी Ankit Sharma यांचा मारेकरी ताहीर हुसेनला जन्मठेप 

२५ फेब्रुवारी, २०२० या दिवशी २६ वर्षीय आयबी अधिकारी अंकित शर्मा (Ankit Sharma)  काही सामान आणण्यासाठी घरातून बाहेर पडले. त्यानंतर ते बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मोठ्या प्रमाणावर शोध घेतला, पण ते सापडले नाहीत.

100
ताहीर हुसेन आणि अंकित शर्मा यांचे चित्र
ताहीर हुसेन, दिल्ली दंगलीतील मुख्य आरोपी.

२०२० च्या दिल्ली दंगलीदरम्यान इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) अधिकारी अंकित शर्मा (Ankit Sharma) यांच्या हत्येच्या अत्यंत वादग्रस्त प्रकरणात, करकरडूमा न्यायालयाने माजी एमसीडी नगरसेवक ताहीर हुसेन याला हत्येसह अनेक गंभीर आरोपांखाली दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने ताहीरसह सर्व पाच आरोपींना शिक्षा सुनावली. जवळपास सहा वर्षे चाललेला खटला, साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. न्यायालयाने ताहीर हुसेनला भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०२ (हत्या), ३६३ (अपहरण) आणि १४७ (दंगल) अंतर्गत दोषी ठरवले. हे सर्व गंभीर गुन्हे आहेत.

१७-२३ फेब्रुवारी, २०२० मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ आणि विरोधात ईशान्य दिल्लीच्या अनेक भागांमध्ये तणाव वाढला. राजधानीतील जाफराबाद, मौजपूर, चांदबाग, करावल नगर आणि खजुरी खास हे भाग सर्वाधिक संवेदनशील बनले. ईशान्य दिल्लीत हिंसाचार उसळला. अनेक भागांमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि गोळीबाराच्या घटना घडल्या. पोलिसांनी परिसरात अतिरिक्त कुमक तैनात केली, परंतु हिंसाचार पसरतच राहिला. २५ फेब्रुवारी, २०२० या दिवशी २६ वर्षीय आयबी अधिकारी अंकित शर्मा (Ankit Sharma)  काही सामान आणण्यासाठी घरातून बाहेर पडले. त्यानंतर ते बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मोठ्या प्रमाणावर शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. त्याच दिवशी, चांदबाग भागातील ताहीर हुसेन यांच्या घराच्या छतावरून दगडफेक आणि पेट्रोल बॉम्ब फेकल्याचे आरोप समोर आले. २६ फेब्रुवारी, २०२० ला दिल्लीच्या खजुरी खास येथील एका गटारात अंकित शर्मा (Ankit Sharma)   यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. शवविच्छेदनात त्याच्या शरीरावर धारदार शस्त्रांच्या अनेक जखमा आढळून आल्या. त्यांचे वडील, रवींद्र कुमार यांनी ताहीर हुसेन आणि इतरांविरुद्ध हत्येचा आरोप करत तक्रार दाखल केली.

(हेही वाचा पेपरफुटी विरोधातील विधेयक संमत आता लक्ष्य Delimitation Bill; दोन-तृतीयांश मतांची जमवाजमव झाली का?)

मार्च २०२० ला दिल्ली पोलिसांनी ताहीर हुसेनला अटक केली. त्याच्या घराच्या झडतीत छतावर मोठ्या प्रमाणात दगड, पेट्रोल बॉम्ब बनवण्याचे साहित्य, ॲसिडची पाकिटे, गोफण आणि इतर साहित्य सापडल्याचा दावा करण्यात आला. ताहीरचे घर दंगलखोरांसाठी एक तळ म्हणून वापरले जात असल्याचा आरोप पोलिसांनी केला. याच वेळी दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात असा दावा करण्यात आला की, अंकित शर्माला जमावाने पकडून त्याची निर्घृणपणे हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह गटारात फेकून दिला. या प्रकरणात अनेक प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आले. न्यायवैद्यक अहवाल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. (Ankit Sharma)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.