करदात्यांसाठी आज ITR Deadline भरण्याची शेवटची तारीख, मुदतवाढ होणार का? जाणून घ्या…

59
ITR Filing 31 August 2026 : ३१ ऑगस्टपर्यंत आयटीआर भरा; व्यवसाय, फ्रीलान्स आणि व्यावसायिकांसाठी महत्त्वाची शेवटची तारीख

ITR Deadline: आर्थिक वर्ष २०२५-२६साठी ITR-1 आणि ITR-2 भरणाऱ्या करदात्यांसाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे पगारदार कर्मचारी, पेन्शनधारक आणि ऑडिटची आवश्यकता नसलेल्या बहुतांश करदात्यांनी आजच आपला ITR दाखल करणे आवश्यक आहे.

अनेक करदात्यांना यंदाही ३१ जुलैनंतर ITR भरण्याची अंतिम मुदत वाढवली जाईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी सरकारने मुदतवाढ दिल्यामुळे यंदाही तसाच निर्णय होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते यंदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कारण आयकर विभागाने ई-फायलिंग पोर्टल अधिक सक्षम केले आहे. विभागाच्या माहितीनुसार, हे पोर्टल आता दररोज सुमारे १ कोटी ITR प्रक्रिया करण्यास सक्षम आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रिटर्न दाखल होत असले तरी प्रणालीवर अतिरिक्त ताण येत नसल्याचे सांगितले जात आहे. आयकर विभागाकडून ३१  जुलै २०२६ सायंकाळी ५ वाजेपर्यंत ITR-1 आणि ITR-2 साठी कोणतीही मुदवाढ देण्यात आली नाही.

हेही वाचा  –  “आपली व्यवस्था पूर्णपणे कोलमडलीय, मान्य करा… ”; Pakistan च्या गृहमंत्र्यांनीच दिली कबुली!

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ५.५ कोटींहून अधिक ITR दाखल करण्यात आले आहेत. यातील यापैकी ३० जुलै रोजीच ४२ लाखांहून अधिक करदात्यांनी आपला ITR भरला आहे. तर दंड, व्याज आणि आयकर विभागाच्या नोटिसा टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करदाते शेवटच्या दिवशीही रिटर्न भरत आहेत.

करदाते आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर PAN क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करून ऑनलाइन ITR दाखल करू शकतात. याशिवाय, अनेक फिनटेक प्लॅटफॉर्म शुल्क आकारून ITR भरण्याची सुविधा देतात.

  • 31 ऑगस्ट 2026 – व्यवसाय किंवा फ्रीलान्स उत्पन्न असलेले, पण कर ऑडिट लागू नसलेले करदाते यात TR-3 आणि ITR-4 भरणारे करदाते येतात.
  • 31 ऑक्टोबर 2026 – ज्या व्यवसाय किंवा व्यावसायिकांना कर ऑडिट आवश्यक आहे त्यांचासाठी ही तारीख देण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.