भारतातील सीजेपी आंदोलनाच्या धर्तीवर आता पाकिस्तान सरकारला तरुणांमधील असंतोषाविषयी भीती सतावत असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना भीती व्यक्त करत आपल्याच सरकारला सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. “तुम्ही त्यांना तरुण म्हणा किंवा कॉक्रोच किंवा आणखी दुसरं काही. मात्र, जर ते एकत्र आले तर ते सर्व काही उलथवून टाकू शकतात”, असं मोहसीन नक्वी यांनी म्हटलं. नक्वी यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच्या आर्थिक अपयशाची कबुलीच दिली आहे.(Pakistan Minister Admits System Has Collapsed)
(हेही वाचा : भाजपचे प्रवक्ते Shehzad Poonawala यांचे राजकीय निवृत्तीचे संकेत? एक्सवरील बायो बदलल्यानं चर्चा; काय लिहिलंय?)
मोहसीन नक्वी यांनी काय म्हटलं?
“आपल्या तरुणांना जे हवं ते आपण त्यांना देऊ शकत नाही. तुम्ही त्यांना तरुण म्हणा, ‘कॉक्रोच’ म्हणा किंवा काहीही म्हणा. पण जर हेच ‘कॉक्रोच’ एकत्र आले, तर ते सर्व काही उलथवून टाकू शकतात. आपण ज्या व्यवस्थेत आहोत, ती कोलमडली आहे. तुम्ही ते मान्य करा किंवा करू नका. पण गेल्या ७० वर्षांपासून आपण ही व्यवस्था कशीतरी ओढत नेण्याचा प्रयत्न करत आहोत”, असं मोहसीन नक्वी यांनी म्हटलं आहे.(Pakistan Minister Admits System Has Collapsed)
(हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास होणार प्रदूषणमुक्त; KDMT च्या ताफ्यात १० नव्या इलेक्ट्रिक बसेस दाखल)
पाकिस्तानवर असलेल्या कर्जाचा आणि त्यातून सुटकेचा कोणताही मार्ग दिसत नसल्याचा मुद्दा देखील नक्वी यांनी मांडला. मात्र, कर्जाची ही परिस्थिती सुधारणं हे आपलं कर्तव्य असल्याचं सांगत मोहसीन नक्की यांनी त्यांच्याच सरकारवर टीका केली. नक्वी यांनी तरुणांमधील वाढत्या असंतोषाचा मुद्दा प्रामुख्याने अधोरेखित करताना ‘कॉक्रोच’ शब्दाचा उच्चार केला.(Pakistan Minister Admits System Has Collapsed)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community

