Pune Rain Update : पुण्यात पावसाचा धुमाकूळ! खडकवासला धरणातून ४३,५७१ क्युसेकने विसर्ग सुरू 

98
Pune Rain Update : पुण्यात पावसाचा धुमाकूळ! खडकवासला धरणातून ४३,५७१ क्युसेकने विसर्ग सुरू 
Pune Rain Update : पुण्यात पावसाचा धुमाकूळ! खडकवासला धरणातून ४३,५७१ क्युसेकने विसर्ग सुरू 

राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली आहे. या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) पुण्यासह विदर्भात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तसेच सखल भागात पाणी साचल्याने अनेक प्रमुख रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे. दरम्यान, पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वेगाने वाढवण्यात आला असून परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  (Pune Rain Update)

(हेही वाचा – US-Iran conflict: सैन्य गाझातून माघार घेणार…डोनाल्ड ट्रम्प यांनी केली हमास कराराची घोषणा)

धरणांमधून मोठा विसर्ग आणि सखल भागात पाणी
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ करून तो तब्बल ४३,५७१ क्युसेकपर्यंत पोहोचवला आहे. यामुळे मुठा नदीपात्राची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली असून शहरातील एकतानगरीसह विविध सखल भागांतील नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या जात असून वाहने सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Pune Rain Update)

(हेही वाचा – भरपावसात पावनखिंडीत इतिहासाचा जागर; Hindu Janajagruti Samiti तर्फे ‘पावनखिंड मोहीम’ उत्साहात )

आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासनाचा इशारा
पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरण साखळीतही पाणीसाठा पूर्ण क्षमतेच्या जवळ पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर मुठा नदीकाठच्या रहिवाशांना तातडीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये तसेच शेतीची अवजारे आणि जनावरे त्वरित सुरक्षित ठिकाणी हालवावीत, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि महापालिका संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.