Disha Salian मृत्यू प्रकरणाचा गुंता सुटणार; थेट दिल्लीहून आलेल्या CBI अधिकारी Seema Pahuja आहेत कोण?

दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने या प्रकरणाच्या नव्याने आणि सखोल सीबीआय तपासाचे आदेश दिले होते. (Seema Pahuja)

19

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अधिकृतपणे गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे, अभिनेता डिनो मोरिया, सूरज पांचोली, रिया चक्रवर्ती आणि दिशाचा प्रियकर रोहन रॉय यांच्या नावांचा समावेश असल्याने राजकीय व मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने या प्रकरणाच्या नव्याने आणि सखोल सीबीआय तपासाचे आदेश दिले होते. (Seema Pahuja)

तपासाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि सद्यस्थिती

दिल्ली सीबीआय मुख्यालयातील ‘स्पेशल क्राईम्स युनिट’च्या पोलीस अधीक्षक (SP) सीमा पाहुजा (Seema Pahuja) यांच्याकडे या तपासाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यांना पोलीस उपअधीक्षक पुरण कुमार व इतर अधिकारी सहकार्य करत आहेत. घटनेच्या दिवशी रोहन रॉयच्या घरी उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींचे जबाब सीमा पाहुजा (Seema Pahuja) यांची टीम नव्याने नोंदवणार आहे. सीबीआयने तीन पानांचा एफआयआर आणि सात पानांचा प्राथमिक जबाब सादर केला आहे. सीबीआयकडून एफआयआरची प्रत लवकरच उच्च न्यायालयात सादर केली जाणार असून, संबंधित राजकीय व्यक्ती व कलाकारांच्या चौकशीची परवानगी मागितली जाण्याची शक्यता आहे. आधीचा तपास अपुरा असल्याचे ताशेरे ओढत न्यायालयाने ठोस पुरावे समोर येईपर्यंत कोणालाही थेट दोषी धरले जाऊ नये, असे स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा Disha Salian मृत्यू प्रकरणात CBIचा अखेर FIR; संशयितांची यादी मोठी, पण आरोपींच्या कॉलममध्ये एकही नाव नाही!)

कोण आहेत तपास अधिकारी सीमा पाहुजा?

सीमा पाहुजा (Seema Pahuja) गुंतागुंतीच्या व हाय-प्रोफाइल गुन्ह्यांच्या तपासासाठी ओळखल्या जातात. त्यांनी हाथरस, उन्नाव, कोलकाता आर. जी. कर रुग्णालय प्रकरण आणि शिमला येथील कोटखाई (गुडिया) हत्याकांडाचा तपास यशस्वीरीत्या हाताळला आहे. आधुनिक फॉरेन्सिक सायन्सच्या प्रभावी वापरासाठी त्यांचा विशेष हातखंडा मानला जातो. गुन्ह्यांच्या उत्कृष्ट आणि बारकाईने केलेल्या तपासाबद्दल त्यांना २०२१ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट तपास अधिकारी’ म्हणून सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. ८ जून २०२० रोजी घडलेल्या या घटनेला सहा वर्षे उलटून गेल्यानंतर नव्याने पुरावे गोळा करणे आणि प्रकरणाचा उलगडा करणे हे सीबीआय आणि अधिकारी सीमा पाहुजा (Seema Pahuja) यांच्यासमोरील मोठे आव्हान असणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.