सिद्धिविनायकाचे दर्शन ते ‘वर्षा’वर बाप्पाचे औक्षण; Nitin Nabin यांच्या मुंबई दौऱ्याची जोरदार चर्चा

20
सिद्धिविनायकाचे दर्शन ते 'वर्षा'वर बाप्पाचे औक्षण; Nitin Nabin यांच्या मुंबई दौऱ्याची जोरदार चर्चा
  • प्रतिनिधी

Nitin Nabin                छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळपासूनच शेकडो कार्यकर्त्यांची तुफान गर्दी उसळली होती. ढोल-ताशांच्या दणदणाटात आणि सुहासिनींच्या औक्षण सोहळ्यात एका बड्या नेत्याचे जंगी स्वागत करण्यात आले. या आगमनानंतर मुंबईतील अनेक प्रमुख भागांत राजकीय नेत्यांची मोठी लगबग पाहायला मिळाली. सिद्धिविनायक ट्रस्टचे खजिनदार पवन त्रिपाठी यांनी प्रभादेवीत मान्यवरांचे स्वागत केले, तर वांद्रे रिक्लमेशन येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही या दौऱ्यात भेट देण्यात आली. (Nitin Nabin)

(हेही वाचा – Love Jihad : यश ठाकूर अशी ओळख सांगून अनामिकासोबत प्रेमाचे नाटक करणारा निघाला शहनवाज; जाब विचारला म्हणून कारने फरफटत नेले)

त्यानंतर हालचालींचा केंद्रबिंदू थेट सत्तेच्या वर्तुळात पोहोचला. मलबार हिलवरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी दिग्गज मंडळी जमली होती. या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेण्यात आली, तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही सदिच्छा भेट घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. या संपूर्ण दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, पणन मंत्री जयकुमार रावल, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, आमदार संजय उपाध्याय, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. (Nitin Nabin)

(हेही वाचा – Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या टी-२० मालिकेत संधी? श्रेयस अय्यरने दिले मोठे संकेत)

या सर्व जोरदार राजकीय घडामोडींचे मुख्य कारण म्हणजे, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर मुंबईत दाखल झाले होते. या दौऱ्यादरम्यान नबीन यांनी प्रभादेवीच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन विधिवत पूजा केली आणि त्यानंतर ‘लालबागच्या राजा’च्या चरणी लीन होत बाप्पाचा आशीर्वाद घेतला. देशातील जनतेला सुख, शांती आणि समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना या वेळी त्यांनी विघ्नहर्त्याच्या चरणी केली. (Nitin Nabin)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.