Love Jihad : यश ठाकूर अशी ओळख सांगून अनामिकासोबत प्रेमाचे नाटक करणारा निघाला शहनवाज; जाब विचारला म्हणून कारने फरफटत नेले

पोलिसांनी सध्या आरोपी शहनवाजला अटक केली असून त्याची चौकशी करत आहेत. (Love Jihad)

11

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील गोमती नगर एक्सटेंशन येथील जनेश्वर मिश्रा पार्कसमोर मुस्लिम शहनवाज नावाच्या आरोपीने त्याची प्रेयसी अनामिका हिला स्वतःची यश ठाकूर असे खोटे नाव सांगून स्वतःची हिंदू असल्याची ओळख (Love Jihad) सांगितली होती. मात्र ज्या वेळी अनामिकाला सत्य समजले तेव्हा तिने याविषयी शहनवाजला जाब विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिला कारखाली चिरडले.

अनामिकासोबत प्रेमात राहणारा शहनवाज हा जेव्हा दुसऱ्या मुलीच्या प्रेमात आहे आणि तो तिला घेऊन गाडीने जात असल्याचे अनामिकाला समजले, त्यामुळे तिने त्याला थांबवण्यासाठी कारच्या समोर उभी राहिली. तेव्हा तो गाडी वेगाने पळवून घेऊन गेला. अनामिका गाडीच्या बोनेटवर फरफटत गेली आणि आरोपी शहनवाज पळून गेला, ज्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी सध्या आरोपी शहनवाजला अटक केली असून त्याची चौकशी करत आहेत. (Love Jihad)

(हेही वाचा Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात वीर सावरकर विचारांचा जागर, ‘जेन झी’च्या संकल्पनेतून साकारला जीवनपट)

अनामिका सकाळी जनेश्वर मिश्रा पार्कमध्ये चहा पिण्यासाठी गेली होती, तेव्हा आरोपी शहनवाज दुसऱ्या महिलेसोबत एका चहाच्या टपरीवर आला. अनामिकाने आरोप केला की, शहनवाज ‘यश ठाकूर’ असल्याचा दावा करून तिच्यासोबत संबंध ठेवत होता. जेव्हा अनामिकाने त्याला दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे पाहिले, जेव्हा तिने त्याची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्या लक्षात आले की, तो यश नसून शहनवाज आहे. (Love Jihad) जेव्हा तिने या फसवणुकीवर त्याला जाब विचारला तेव्हा त्या दोघांमध्ये वाद झाला. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अनामिका तिच्या स्कूटरवरून आली आणि रस्त्यावर उभी असलेली गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शहनवाजने कर थांबण्याऐवजी ती पुढे नेली. अनामिका गाडीच्या बोनेटवर पडली आणि सुमारे २०० ते ३०० मीटरपर्यंत फरफटत गेली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी गाडी थांबवण्यासाठी आरडाओरडा केला आणि दगडफेक केली, परंतु आरोपी गाडी घेऊन पळून गेला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पीडित मुलगी बोनेटवर असल्याचे आणि लोक गाडीवर दगडफेक करत असल्याचे दिसत आहे. (Love Jihad)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.