Maratha Reservation : अंतरवली सराटीच्या लाठीमारात नेमकं काय घडलं होतं? अखेर समोर आलं बंद पानांमागचं गूढ सत्य!

17
Maratha Reservation : अंतरवली सराटीच्या लाठीमारात नेमकं काय घडलं होतं? अखेर समोर आलं बंद पानांमागचं गूढ सत्य!
  • प्रतिनिधी

Maratha Reservation           जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराचे पडसाद अद्यापही राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. या आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेला दगडफेक आणि त्यानंतर पोलिसांनी केलेला लाठीमार यावरून विरोधकांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरले होते. गृहमंत्रालयाच्या कार्यपद्धतीवर आणि पोलिसांच्या भूमिकेवर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. (Maratha Reservation)

(हेही वाचा – UPI MDR Framework : युपीआय एमडीआरचा नेटफ्लिक्स, एसआयपी, ईएमआयवर काय परिणाम होणार? जाणून घ्या नवीन नियम)

या घटनेमुळे संपूर्ण राज्यात जनआक्रोश उसळला आणि मराठा आरक्षणाचा लढा अधिकच तीव्र झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर सक्तीच्या रजेची तसेच बदल्यांची कारवाई करण्यात आली होती. सामान्य जनतेमध्ये मात्र त्या दिवशी तिथे नेमकं काय घडलं, लाठीमाराची सुरुवात कशी झाली आणि यात नक्की कोणाचे किती नुकसान झाले, याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Love Jihad : यश ठाकूर अशी ओळख सांगून अनामिकासोबत प्रेमाचे नाटक करणारा निघाला शहनवाज; जाब विचारला म्हणून कारने फरफटत नेले)

दरम्यान, याच प्रकरणावर आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. “अंतरवली सराटीत पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली नसून, तिथे आंदोलकांकडून तब्बल ८४ पोलिसांना बेदम चोपण्यात आले होते आणि त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात ॲडमीट करावे लागले होते,” असा धक्कादायक दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. केवळ पोलिसांनाच टार्गेट करून गुन्हेगार ठरवले जात असताना, एवढ्या मोठ्या संख्येने जखमी झालेल्या खाकी वर्दीतील जवानांचा विचार का केला जात नाही, असा थेट सवालही मंत्री भुजबळांनी उपस्थित केला आहे. (Maratha Reservation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.