
-
ऋजुता लुकतुके
Sunil Gavaskar Appeal to BCCI भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला क्रिकेट सल्लागार समितीची भूमिका आणि व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवण्याची सूचना केली आहे. भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी केवळ निवड समिती आणि प्रशिक्षक निवडीपुरती मर्यादित समिती न ठेवता, देशातील अनुभवी माजी क्रिकेटपटूंच्या ज्ञानाचा व्यापक वापर करावा, असे सुनील गावसकर यांनी म्हटले आहे. (Sunil Gavaskar Appeal to BCCI)
गावसकर यांनी आपल्या ‘मिड-डे’मधील स्तंभातून सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, रवी शास्त्री, अनिल कुंबळे, हरभजन सिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांसारख्या माजी क्रिकेटपटूंचा सल्लागार समितीत समावेश करण्याची कल्पना मांडली. त्यांच्या मते, या खेळाडूंच्या दीर्घ अनुभवाचा भारतीय क्रिकेटच्या प्रशासकीय आणि विकासात्मक निर्णयांमध्ये उपयोग होऊ शकतो. (Sunil Gavaskar Appeal to BCCI)
(हेही वाचा – सिद्धिविनायकाचे दर्शन ते ‘वर्षा’वर बाप्पाचे औक्षण; Nitin Nabin यांच्या मुंबई दौऱ्याची जोरदार चर्चा)
सध्या क्रिकेट सल्लागार समितीची प्रमुख जबाबदारी मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीच्या नियुक्तीशी संबंधित आहे. गावसकर यांच्या मते, तिची भूमिका यापेक्षा व्यापक असावी. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक, भारतीय क्रिकेटशी संबंधित महत्त्वाचे निर्णय आणि एकूण क्रिकेट विकास या विषयांवरही या समितीने काम करावे, असे त्यांनी सुचवले आहे. (Sunil Gavaskar Appeal to BCCI)
गावसकर यांच्या या सूचनेमागे अलीकडील दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्याची पार्श्वभूमीही आहे. पूर्व विभागाने पहिल्या डावातील मोठ्या आघाडीच्या आधारे दक्षिण विभागावर विजेतेपद मिळवले. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात दोन्ही कर्णधारांनी सामना थांबवण्यास सहमती दर्शवली. या निकालाच्या पद्धतीवर गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक असलेली मानसिकता आणि २० बळी घेण्याची सवय विकसित व्हावी, यासाठी नियम आणि रचना यांचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. (Sunil Gavaskar Appeal to BCCI)
(हेही वाचा – Maratha Reservation : अंतरवली सराटीच्या लाठीमारात नेमकं काय घडलं होतं? अखेर समोर आलं बंद पानांमागचं गूढ सत्य!)
गावस्कर यांनी महिला क्रिकेटसाठीही अशाच प्रकारची स्वतंत्र सल्लागार समिती असावी, अशी सूचना केली आहे. प्रशिक्षक, कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखासोबत अनुभवी माजी खेळाडूंची अशी समिती संवाद साधेल, तर त्यांच्या अनुभवाचा उपयोग क्रिकेटच्या दीर्घकालीन विकासासाठी होऊ शकतो, असे त्यांचे मत आहे. (Sunil Gavaskar Appeal to BCCI)
गावसकर यांनी सुचवलेली ही रचना सध्या केवळ एक सूचना आहे. बीसीसीआयने अशी समिती स्थापन करण्याचा कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र भारतीय क्रिकेटच्या प्रशासकीय व्यवस्थेत माजी दिग्गज खेळाडूंच्या अनुभवाचा अधिक व्यापक वापर करावा का, हा प्रश्न त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. (Sunil Gavaskar Appeal to BCCI)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
