डोक्यावर फेटे अन् बाप्पाचे दर्शन; ८ देशांच्या वाणिज्यदूतांनी अनुभवला मुंबईच्या Ganeshotsav चा ऐतिहासिक सोहळा

11
डोक्यावर फेटे अन् बाप्पाचे दर्शन; ८ देशांच्या वाणिज्यदूतांनी अनुभवला मुंबईच्या Ganeshotsav चा ऐतिहासिक सोहळा
  • प्रतिनिधी

Ganeshotsav                  मुंबईच्या रस्त्यांवर ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात एक आगळावेगळा सोहळा माटुंगा येथील खालसा महाविद्यालयात रंगला होता. भारताच्या पारंपारिक संस्कृतीचा मान राखत, डोक्यावर डौलाने फडकणारे फेटे आणि हातात पुष्पगुच्छ घेऊन अनेक परदेशी पाहुणे भारावून गेलेले पाहायला मिळाले. अवघे जग ज्या महानगराच्या वेगाकडे पाहत असते, त्याच मुंबईच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि सामाजिक एकतेचा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी या पाहुण्यांनी थेट मुंबईकरांच्या लाडक्या बाप्पाच्या दरबारात पाऊल ठेवले. (Ganeshotsav)

(हेही वाचा – सिद्धिविनायकाचे दर्शन ते ‘वर्षा’वर बाप्पाचे औक्षण; Nitin Nabin यांच्या मुंबई दौऱ्याची जोरदार चर्चा)

या विशेष दौऱ्यादरम्यान पाहुण्यांनी माटुंग्याचा प्रसिद्ध जी.एस.बी. गणपती, वडाळा येथील जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सव, लालबाग-गणेश गल्लीचा ऐतिहासिक ‘मुंबईचा राजा’ आणि शतकाहून अधिक जुनी परंपरा जपणाऱ्या गिरगावातील ‘केशवजी नाईक चाळ’ येथे जाऊन मनोभावे दर्शन घेतले. महाराष्ट्राचा दहा दिवसांचा हा लोकोत्सव केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नसून, त्यात लोकसहभाग, समृद्ध इतिहास, लोककला आणि एकात्मतेचा वैश्विक संदेश दडलेला आहे, याची सविस्तर माहिती या वेळी प्रतिनिधींना देण्यात आली. या उपक्रमाला राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी शुभेच्छा दिल्या, तर पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, अपर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि व्यवस्थापक मानसी कोठारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. (Ganeshotsav)

(हेही वाचा – Maratha Reservation : अंतरवली सराटीच्या लाठीमारात नेमकं काय घडलं होतं? अखेर समोर आलं बंद पानांमागचं गूढ सत्य!)

महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी आयोजित या उपक्रमात तब्बल आठ बड्या देशांच्या वाणिज्यदूतांनी मुंबईतील गणेशोत्सवात हजेरी लावून बाप्पाचे दर्शन घेतले, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. या दौऱ्यात फिनलंडच्या उपवाणिज्यदूत जोन्ना सुनी, फ्रान्सचे वाणिज्यदूत पॅट्रिक लेव्हरिनो, सामंथा नुवेल, थायलंडच्या वाणिज्यदूत सिरिपॉर्न सुपानिमितविसेतकुल यांच्यासह संपूर्ण शिष्टमंडळ, नॉर्वेच्या वाणिज्यदूत मोनिका ओम्मुंडसेन नागेलगार्ड, बेल्जियमचे वाणिज्यदूत पियरे स्टेव्हर्लिन्क, स्वीडनच्या प्रतिनिधी साने यामादा, इजिप्तच्या वाणिज्यदूत जनरल दिना अल अहे तसेच चीनचे वाणिज्यदूत जी श्युएचुई व त्यांच्या सहकाऱ्यांनी सपत्निक सहभाग घेतला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची कला, लोकजीवन आणि आतिथ्यशीलता जगभर पोहोचत असून आंतरराष्ट्रीय पर्यटनाला यातून मोठी गती मिळेल, असा विश्वास मंत्री देसाई यांनी व्यक्त केला. (Ganeshotsav)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.