‘तुकाराम मुंढे केवळ कायद्याचेच पालन करत आहेत!’ मंत्री Nitesh Rane यांच्याकडून कौतुक; विरोधकांवर जोरदार प्रहार

109
'तुकाराम मुंढे केवळ कायद्याचेच पालन करत आहेत!' मंत्री Nitesh Rane यांच्याकडून कौतुक; विरोधकांवर जोरदार प्रहार
'तुकाराम मुंढे केवळ कायद्याचेच पालन करत आहेत!' मंत्री Nitesh Rane यांच्याकडून कौतुक; विरोधकांवर जोरदार प्रहार

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या कारवाईचे मंत्री नितेश (Nitesh Rane) राणे यांनी उघडपणे कौतुक केले आहे. तुकाराम मुंढे हे कोणतेही वेगळे काम करत नसून ते केवळ शासकीय नियम, कायदे आणि सरकारी निर्णयांचे काटेकोर पालन करत आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात कडक शिस्तीचे आणि नियमाने काम करणारे अनेक अधिकारी असल्यामुळेच राज्याला प्रगतशील राज्य म्हणून ओळख मिळाली आहे, असे सांगत त्यांनी प्रशासकीय कारवायांचे पूर्ण समर्थन केले. (Nitesh Rane)

(हेही वाचा – दिल्ली दंगलीची ‘ती’ काळी रात्र; हत्या झालेल्या आयबी अधिकारी Ankit Sharma यांचा मारेकरी ताहीर हुसेनला जन्मठेप )

प्रामाणिक अधिकाऱ्यांचे कौतुक आणि प्रशासकीय शिस्त
प्रशासनात काम करताना सर्वांनी नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे सांगताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचाही हाच प्रयत्न आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे प्रशासनाचा धाक निर्माण होतो. मी माझ्या भाषणातून अशा सर्व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे कौतुकच केले असून, नियमांचे पालन करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. (Nitesh Rane)

(हेही वाचा – Odisha Medical Pepar Leak: पुन्हा पेपरफूटी! ओडिशामध्ये परीक्षा सुरू होण्यापूर्वी डॉक्टरकीची प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांवर प्रसारित)

विरोधी नेत्यांवर कडाडून टीका आणि राजकीय प्रहार
या वेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर अत्यंत आक्रमक शब्दांत राजकीय प्रहार केला. खासदार संजय राऊत यांनी आपल्या राजकीय मर्यादेत राहून वक्तव्ये करावीत, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावरही त्यांनी ताशेरे ओढले. विरोधकांना केवळ शासकीय कामांमध्ये चुका शोधायची सवय झाली असून, त्यांनी स्वतःच्या कार्यकाळातील चुकांचा आणि गैरकारभाराचा हिशोब द्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.