FDA Action : मुंबईत कारवाईचा धडाका; अंधेरीत ९०० किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त

अंधेरीतील कारवाईत अन्न व औषध प्रशासनाला (FDA) मोठे यश; विनापरवाना सुरू होता उद्योग

106
FDA
FDA
  • प्रतिनिधी

FDA Action             मुंबईत अन्न भेसळीच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आक्रमक पवित्रा घेतला असून, अंधेरी (पश्चिम) परिसरात छापा टाकून तब्बल ९०० किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल रोडवरील ‘एकता को-ऑपरेटिव्ह सोसायटी’मध्ये मोठ्या प्रमाणावर चहा पावडरमध्ये भेसळ होत असल्याची गुप्त माहिती एफडीएला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता, तिथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. (FDA Action)

(हेही वाचा – Operation Tiger : ‘फोडाफोडी’ची खेळी नेमकी कोणासाठी फायदेशीर? सत्तेचे गणित आणि लोकशाहीचा पेच)

एफडीएच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी मोठ्या प्लास्टिकच्या टबमध्ये चहा पावडरवर प्रक्रिया करताना काही लोक आढळले. चहा पावडरला गडद आणि नैसर्गिक रंग देण्यासाठी त्यात घातक रंगद्रव्ये (Coloring Agents) आणि पाणी मिसळले जात होते. या बेकायदेशीर प्रक्रियेत ९०० किलो भेसळयुक्त चहा पावडर आणि १७ किलो संशयास्पद रंगद्रव्ये जप्त करण्यात आली आहेत. या सर्व साठ्याची एकूण किंमत सुमारे २ लाख १८ हजार ७२० रुपये इतकी आहे. तपासणीदरम्यान याठिकाणी कोणताही वैध एफएसएसएआय (FSSAI) परवाना नसल्याचे आढळून आले. एफडीएने या आस्थापनेला तातडीने कामकाज बंद करण्याची नोटीस बजावली आहे. (FDA Action)

(हेही वाचा – Operation Tiger चा धसका; शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आठही खासदारांसाठी उचलले मोठे पाऊल)

या प्रकरणातील आरोपींविरुद्ध डी. एन. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. अन्न नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, जेणेकरून त्यात वापरलेल्या रसायनांचे गांभीर्य स्पष्ट होईल. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि सहआयुक्त (अन्न) महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यापाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. (FDA Action)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.