Kerala School Holiday 21 September: केरळमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळून दोघांचा मृत्यू, शाळांना सुट्टी जाहीर

23
Kerala School Holiday 21 September: केरळमध्ये मुसळधार पावसामुळे दोघांचा मृत्यू, शाळांना सुट्टी जाहीर
Kerala School Holiday 21 September: केरळमध्ये मुसळधार पावसामुळे दोघांचा मृत्यू, शाळांना सुट्टी जाहीर

Kerala School Holiday 21 September: केरळममध्ये कोट्टायम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तमिळनाडूतील ३५ वर्षीय महिला पर्यटक आणि एका ८० वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळममध्ये पुढील पाच दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईस्थित जवाहर नगर येथील रहिवासी असलेल्या संगीता या रविवारी दुचाकीवरून वागामोनच्या दिशेने जात होत्या. त्याच वेळी एराटुपेट्टा वागामोन मार्गावरील टीकोयजवळील वेलाथुसेरी येथे त्यांच्या दुचाकीवर अचानक दरड कोसळली. या दुर्घटनेमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दुसरी घटना पूंजार नाडुभागम गावात मंगलगीरी येथे घडली. घरावर दरड कोसळून ८० वर्षीय वृद्ध चेलाक्कट्ट जोसेफ यांचा मृत्यू झाला. कोट्टायम येथील वागामोन, मेलाडुक्क् तसेच आदिवाम परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक भागांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. एराहृपेट्टा-वागामोन मार्गावरील करिकाड टॉप येथेही दरड कोसळून दोन कार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मीनाचिल नदीच्या उपनद्यांमधील पाण्याचा प्रवाहही वाढला आहे.

हेही वाचा – Apple Foldable iPhone : भारतीयांमध्ये फोल्डिंग आयफोनची एवढी क्रेझ का? रेग्युलर आयफोनपेक्षा काय आहे खास?

पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज 

दरम्यान, रविवारी केरळच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. इडुक्की जिल्ह्यातील उडुंबन्नूर येथे राज्यातील सर्वाधिक ६२ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने इडुक्की आणि कोट्टायम जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

केरळमधील शाळांना सोमवार, २१ सप्टेंबर रोजी सुट्टी असणार आहे, कारण हा दिवस ‘श्री नारायण गुरु समाधी दिन’ म्हणून साजरा केला जातो. ते एक प्रख्यात समाजसुधारक आणि आध्यात्मिक नेते होते, ज्यांच्या शिकवणीचा केरळच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासावर चिरस्थायी प्रभाव पडला आहे. त्यामुळे, शालेय दिनदर्शिकेनुसार, शिक्षण विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.