राज्यात २९ सप्टेंबरला एक हजार रोजगार मेळावे; कौशल्य विकास मंत्री Mangal Prabhat Lodha यांची माहिती

9
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat Lodha
  • प्रतिनिधी

Mangal Prabhat Lodha : राज्यातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत २९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती या विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सोमवारी दिली. ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ रोजगार मेळाव्यांमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राज्यातील युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि आवडीनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यात रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक युवकांना विविध आस्थापना आणि उद्योगांमधील रोजगाराच्या संधींची माहिती मिळणार असल्याचे लोढा यांनी सांगितले.

(हेही वाचा – भाजप आमदार Pravin Darekar यांच्या ताफ्याबाबत मुंबईत अचानक काय घडलं? फ्रीवेवर उडाली एकच खळबळ )

माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद–२०२६’ अभियानांतर्गत गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील विविध गणेश मंडळांमध्ये नागरिकांशी संवाद साधून रोजगार मेळावे आणि उपलब्ध रोजगाराच्या संधींबाबतआज माहिती देण्यात आली.

मलबार हिल येथील मीनल क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीत मुंबई शहर जिल्ह्यातील रोजगार मेळाव्याबाबत कौशल्य विकास अधिकारी विद्या शिंगे, समन्वयक अजय कांबळे, तसेच माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या विभागीय संपर्क अधिकारी संध्या गरवारे, श्रद्धा मेश्राम आणि अश्विनी पुजारी यांनी नागरिकांशी संवाद साधून रोजगार महाकुंभाची माहिती दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.