मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? Maithili Thakurच्या व्हिडीओवरून CAने केली चौकशीची मागणी

9
मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? Maithili Thakurच्या व्हिडीओवरून CAने केली चौकशीची मागणी
मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? Maithili Thakurच्या व्हिडीओवरून CAने केली चौकशीची मागणी

Maithili Thakur: गायिका आणि आमदार मैथिली ठाकूर सध्या तिच्या आलिशान रोल्स रॉयस (Rolls Royce) कारमुळे चर्चेत आहे. नुकतीच ती मुंबईत लालबागचा राजा गणपतीच्या दर्शनाला रोल्स रॉयसमधून आली होती. तेव्हाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मैथिलीला ट्रोल केलं जात आहे. तिची मालमत्ता आणि कारच्या किंमतीवरून प्रश्न विचारले जात आहेत.

सीए असलेल्या रुचिता वघानी (CA Ruchita Vaghani)  यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये म्हटलं की, निवडणूक प्रतिज्ञापत्रात मैथिली ठाकूर यांनी ४ कोटी रुपयांपेक्षा कमी मालमत्ता असल्याचं सांगितलंय. आता त्यांच्याकडे १३ कोटींची रोल्स रॉयस कार आहे. ४ कोटींची मालमत्ता असलेल्याकडे १३ कोटींची रोल्स रॉयस कशी असा प्रश्न सीए वघानी यांनी विचारला आहे.

मैथिली ठाकूर यांच्या मालमत्तेबाबत प्रश्न विचारताना सीए वघानी यांनी आयकर विभागालाही टॅग केलंय. मैथिली ठाकूर यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केलीय. एखाद्या सामान्य नागरिकालाच का टार्गेट केलं जातं? आमदारांचीही चौकशी झाली पाहिजे असं वघानी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – नवीन iPhone खरेदी करण्यासाठी भारतीय ग्राहकांची थेट दुबईकडे धाव, फोन स्वस्त की प्रवास महाग?

दरम्यान, एका युजरने कमेंट करताना म्हटलं की, रोल्स रॉयस तिची आहे असं कुणी सांगितलं? गणेश चतुर्थीसाठी अंबानी कुटुंबाच्या निमंत्रणावरून ती मुंबईला गेली होती. याआधीही अंबानी कुटुंबाकडे कार्यक्रम सादर केले आहेत. त्याच दरम्यान ती लालबागचा राजाच्या दर्शनाला गेली होती. त्यासाठी तिची व्यवस्था करण्यात आली असेल.

मैथिली यांनी त्यांच्याकडे जवळपास दोन लाखांची रोकड आणि वेगवेगळ्या बँख खात्यांमध्ये ७२ लाख रुपये असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. तर म्यूचुअल फंड आणि इतर गुंतवणूक ३१ लाख रुपयांची आहे. याशिवाय ५२ लाख रुपये किंमतीचं सोनं आणि दिल्लीत दीड कोटींचा फ्लॅट, एक स्कुटी नावावर असल्याचा खुलासा केला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.