नवीन iPhone खरेदी करण्यासाठी भारतीय ग्राहकांची थेट दुबईकडे धाव, फोन स्वस्त की प्रवास महाग?

21
नवीन iPhone खरेदी करण्यासाठी भारतीय ग्राहकांची थेट दुबईकडे धाव, फोन स्वस्त की प्रवास महाग?
नवीन iPhone खरेदी करण्यासाठी भारतीय ग्राहकांची थेट दुबईकडे धाव, फोन स्वस्त की प्रवास महाग?

iPhone  नवीन iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max खरेदी करण्यासाठी काही भारतीय ग्राहक थेट दुबईची वाट धरत आहेत. भारत आणि यूएईमधील आयफोनच्या किमतीत मोठी तफावत असल्याने हा पर्याय ग्राहकांना आकर्षक वाटत आहे. मात्र, दुबईला जाऊन फोन खरेदी करणे प्रत्यक्षात किती फायदेशीर आहे, यासाठी प्रवास आणि कस्टम्सचा खर्चही विचारात घेणे आवश्यक आहे. यूएईमध्ये iPhone 18 Pro (256GB) ची सुरुवातीची किंमत ५,०९९ दिरहम, म्हणजेच अंदाजे १.३२ ते १.३३ लाख रुपये आहे. भारतात याच मॉडेलची सुरुवातीची किंमत १,६४,९०० रुपये आहे. त्यामुळे फोनच्या किमतीतच सुमारे ३३ हजार रुपयांचा फरक आहे.

तर iPhone 18 Pro Max (256GB) ची यूएईतील किंमत ५,४९९ दिरहम, म्हणजे अंदाजे १.४२ ते १.४४ लाख रुपये आहे. हिंदुस्थानात या फोनची सुरुवातीची किंमत १,७९,९०० रुपये असून, दोन्ही किमतींमध्ये सुमारे ३८ हजार रुपयांची तफावत आहे. यूएईमध्ये ५ टक्के VAT लागू आहे, तर भारतातील कर आणि आयात शुल्काच्या रचनेमुळे स्मार्टफोनच्या अंतिम किमतीवर परिणाम होतो.

पर्याय फायदेशीर कोणासाठी?
केवळ एका फोनसाठी दुबईला जाणाऱ्यांनी विमानभाडे, व्हिसा, हॉटेल आणि कस्टम्सचे नियम यांचा संपूर्ण हिशेब करणे गरजेचे आहे. आधीच दुबईला जाणार असलेल्या व्यक्तीसाठी मात्र हा पर्याय अधिक फायदेशीर ठरू शकतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.