Gujratमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात बॉम्ब असल्याची अफवा, परिसरात खळबळ

13
Gujratमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात बॉम्ब असल्याची अफवा, परिसरात खळबळ
Gujratमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात बॉम्ब असल्याची अफवा, परिसरात खळबळ

Gujrat: गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात (Somnath temple) बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने परिसरात खळबळ उडाली. या धमकीनंतर गुजरातमध्ये सुरक्षेचा इशारा जारी करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथके (BDTS) आणि श्वान पथकांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी सकाळी ९ वाजता गुप्तचर यंत्रणांना बॉम्बच्या धमकीचा मेल प्राप्त झाला. यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. मंदिर व आसपासच्या परिसराची कसून तपासणी करण्यात आली. मात्र तपासणी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. हा ईमेल कुठून आला याबद्दल तपास सुरू आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.