Operation Tiger चा धसका; शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आठही खासदारांसाठी उचलले मोठे पाऊल

Operation Tiger चा धसका; शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आठही खासदारांसाठी उचलले मोठे पाऊल

99
Operation Tiger चा धसका; शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आठही खासदारांसाठी उचलले मोठे पाऊल
Operation Tiger चा धसका; शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आठही खासदारांसाठी उचलले मोठे पाऊल
प्रतिनिधी

​राज्याच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’(Operation Tiger)ची चर्चा जोरात सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडाची भूमिका घेत दिल्ली गाठल्याने आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लोकसभा अध्यक्षांकडे दावा ठोकल्याने राजकीय भूकंप झाला आहे. या घडामोडींचा थेट परिणाम आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातही जाणवू लागला असून, स्वतःच्या गोटातील खासदारांना वाचवण्यासाठी पक्षाने आता युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत.(Operation Tiger)

​ठाकरे गटातील खासदारांच्या बंडानंतर राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन तुतारी’ची कुजबूज सुरू झाली होती. याच पार्श्वभूमीवर सावध झालेल्या शरद पवार यांच्या पक्षाने तातडीने आपल्या आठही खासदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. बंडाची लागण आपल्या पक्षाला होऊ नये आणि खासदारांची निष्ठा टिकून राहावी, यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते थेट मैदानात उतरले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत पक्षाच्या सर्व खासदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत खासदारांना विश्वासात घेऊन पक्षाची पुढील दिशा स्पष्ट केली जाणार आहे.(Operation Tiger)

(हेही वाचा – G7 परिषदेत PM Modi कडाडले; ट्रम्प यांच्या शेजारी बसून पश्चिम आशियातील भारतीय जहाजांवरील हल्ल्यांचा मुद्दा गाजला )

​शिवसेनेतील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत सावध पवित्रा स्वीकारला असून, कोणताही धोका पत्करायचा नाही, अशी रणनीती आखली आहे. शरद पवारांच्या गटातील हे आठ खासदार सध्या पक्षाच्या रडारवर आहेत:

  • ​सुप्रिया सुळे – बारामती
  • ​अमर शरदराव काळे – वर्धा
  • ​भास्कर भगरे – दिंडोरी
  • ​सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) – भिवंडी
  • ​नीलेश लंके – अहमदनगर
  • ​डॉ. अमोल कोल्हे – शिरूर
  • ​धैर्यशील मोहिते-पाटील – माढा
  • बजरंग सोनवणे – बीड

ठाकरेंच्या खासदारांच्या अचानक दिल्लीवारीने आणि त्यानंतर घडलेल्या राजकीय नाट्याने शरद पवारांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. यामुळेच आता राष्ट्रवादीने ‘वेट अँड वॉच’ऐवजी ‘ऍक्शन मोड’मध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीतून नेमका काय संदेश दिला जाणार आणि पक्षातील सर्व खासदार एकसंध राहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.(Operation Tiger)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.