प्रतिनिधी
शिवसेना (ठाकरे गट) फुटणार आणि सहा खासदार शिंदे गटात सामील होणार, अशा चर्चांना सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे आणि खासदारांची वाढती हालचाल यामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच, आता संजय राऊत(Sanjay Raut)यांनी या प्रकरणावर अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे.
मातोश्रीवर झालेल्या बैठकीचा संदर्भ देत संजय राऊत म्हणाले की, पक्षाशी प्रामाणिक राहण्याचे आश्वासन देण्यासाठी अनेक खासदारांनी देव, आई-वडील आणि मुलांच्या आणाभाका घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, ज्या खासदारांवर संशय व्यक्त केला जात आहे, त्यांनी अत्यंत नाट्यमय पद्धतीने आपली निष्ठा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासदाराने तर अवघ्या तीन मिनिटांत तब्बल चार वेळा साईबाबांची शपथ घेतली. “बायको आजारी आहे, मी तुमच्यासोबत आहे (साईबाबांची शपथ), उद्या भेटायला येतो (साईबाबांची शपथ), मरेपर्यंत सोबत राहीन (साईबाबांची शपथ),” अशा प्रकारे शपथविधी सुरू होते, असे राऊत यांनी नमूद केले.(Sanjay Raut)
(हेही वाचा – Accident : गुजरातच्या वडोदरामध्ये भीषण बस अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, ३१ जखमी! )
केवळ साईबाबाच नव्हे, तर अनेकांनी आई, मुले आणि खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या शपथा घेतल्या. ज्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नव्हता, त्यांनीही शपथ घेतल्याने संशय अधिक गडद झाला आहे. यावेळी विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतर नसते, असेही राऊत यांनी मान्य केले.(Sanjay Raut)
दुसरीकडे, भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवताना राऊत म्हणाले की, “हे सर्व दबावतंत्राचा भाग आहे. काल रात्रीच १५ कोटी रुपये पोहोचले आणि त्यानंतर चार्टर्ड विमानाने संबंधित खासदार नांदेड व पुण्यातून दिल्लीला पोहोचले.” ज्या खासदारांना बंड करायचे आहे, त्यांनी राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जावे, असे थेट आव्हानही त्यांनी दिले. हे खासदार मोदींच्या किंवा शिंदे यांच्या नव्हे, तर उद्धव ठाकरे यांच्या नावावर आणि ‘मशाल’ चिन्हावर निवडून आले आहेत, याची आठवणही राऊत यांनी करून दिली. शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असा इशारा देत राऊत यांनी पक्षातील या वाढत्या अस्वस्थतेकडे लक्ष वेधले आहे.(Sanjay Raut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

