-
ऋजुता लुकतुके
Davis Cup 2026 डेव्हिस चषकात भारताचे अंतिम आठमध्ये पोहोचण्याचे स्वप्न अखेर भंगले. दक्षिण कोरियाविरुद्धच्या दुसऱ्या फेरीच्या पात्रता लढतीत भारताला १-३ असा पराभव पत्करावा लागला. सुमित नागलचा निर्णायक एकेरी सामन्यात क्वोन सून-वू याच्याकडून सरळ सेटमध्ये पराभव झाल्यानंतर दक्षिण कोरियाने अंतिम आठमधील स्थान निश्चित केले. (Davis Cup 2026)
भारतासाठी हा सामना सुरुवातीपासूनच कठीण ठरला. शुक्रवारी झालेल्या दोन्ही एकेरी सामन्यांत धक्षिणेश्वर सुरेश आणि सुमित नागल यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारताने ०-२ अशा पिछाडीने केली होती. अंतिम आठमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारताला उरलेले तिन्ही सामने जिंकणे आवश्यक होते. (Davis Cup 2026)
(हेही वाचा – Trump-Zelenskyy भेटीत काय होणार? रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघणार का?)
मात्र शनिवारी एन. श्रीराम बालाजी आणि धक्षिणेश्वर सुरेश यांनी दुहेरी सामन्यात भारताला आशेचा किरण दाखवला. भारतीय जोडीने नाम जी-सुंग आणि पार्क उई-सुंग यांचा ६-३, ३-६, ६-३ असा पराभव करत भारताची पिछाडी १-२ अशी कमी केली. त्यामुळे पुढील एकेरी सामन्याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष लागले होते. (Davis Cup 2026)
या सामन्यात भारताच्या सर्व आशा सुमित नागलवर होत्या. मात्र जागतिक क्रमवारीत १५७व्या स्थानावर असलेल्या क्वोन सून-वूने नागलला ६-१, ६-२असे पराभूत करत दक्षिण कोरियाचा विजय निश्चित केला. नागलने पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला सर्व्हिस राखली, पण त्यानंतर क्वोनने सलग तीन ब्रेक मिळवत सामन्यावर नियंत्रण मिळवले. दुसऱ्या सेटमध्येही त्याने महत्त्वाच्या क्षणी नागलची सर्व्हिस भेदली. (Davis Cup 2026)
(हेही वाचा – ड्रायव्हिंग लायसन्सवरील जुना पत्ता बदलायचाय? RTO च्या फेऱ्या मारण्याची गरज नाही; फोनमधून असं करा अपडेट)
विशेष म्हणजे, नागलने आदल्या दिवशी तीन तासांहून अधिक वेळ चाललेला सामना खेळला होता. त्यामुळे अल्प विश्रांतीनंतर पुन्हा निर्णायक लढतीत उतरावे लागल्याने त्याला थकवा जाणवत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. या पराभवामुळे भारताला आता २०२७ डेव्हिस कप पात्रता फेरीच्या पहिल्या फेरीत खेळावे लागणार आहे. भारताने डेव्हिस कपमध्ये १९६६, १९७४ आणि १९८७ मध्ये उपविजेतेपद मिळवले आहे; मात्र सध्याच्या अंतिम आठच्या स्वरूपात भारताला अद्याप स्थान मिळवता आलेले नाही. (Davis Cup 2026)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

