
-
ऋजुता लुकतुके
Iran US Conflict 2026 अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा वाढत असतानाच होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबत इराणने कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेने आपल्या अटी मान्य करेपर्यंत या महत्त्वाच्या जलमार्गावरील वाहतूक पूर्ववत केली जाणार नाही, तसेच अमेरिकेबरोबर पूर्वीच्या वाटाघाटी पुन्हा सुरू केल्या जाणार नाहीत, असे इराणचे संसदेचे अध्यक्ष महम्मद बाघेर गालिबाफ यांनी स्पष्ट केले आहे. (Iran US Conflict 2026)
इराणने आपल्या मागण्या मध्यस्थांमार्फत अमेरिकेपर्यंत पोहोचवल्या आहेत. इराणच्या मते, अमेरिकेने इराणी जनतेच्या अधिकारांना मान्यता देणे आणि यापूर्वी केलेल्या करारातील आपली आश्वासने पूर्ण करणे आवश्यक आहे. या अटी पूर्ण होईपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका गालिबाफ यांनी मांडली. (Iran US Conflict 2026)
(हेही वाचा – ड्रायव्हिंग लायसन्सवरील जुना पत्ता बदलायचाय? RTO च्या फेऱ्या मारण्याची गरज नाही; फोनमधून असं करा अपडेट)
इराणच्या सुरक्षाविषयक अधिकाऱ्यांनी मांडलेल्या अटींमध्ये अमेरिकेची इराणी बंदरांवरील नौदल नाकेबंदी संपवणे, इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप थांबवणे, इराणविरोधी गटांना अमेरिकेचा पाठिंबा बंद करणे आणि इराणच्या भूभागावरील हल्ले थांबवणे यांचा समावेश आहे. या मागण्यांवरून दोन्ही देशांमधील चर्चेचा मार्ग अद्याप किती कठीण आहे, हे स्पष्ट होते. (Iran US Conflict 2026)
दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने २० सप्टेंबरपर्यंत आपल्या नौदलाने १०९ व्यापारी जहाजांना मार्ग बदलण्यास भाग पाडल्याचा दावा केला आहे. मात्र, या आकडेवारीची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. इराणने बहुतांश व्यापारी वाहतूक रोखली असली तरी काही जहाजांना अद्याप मार्ग मिळत असल्याचे वृत्त आहे. (Iran US Conflict 2026)
(हेही वाचा – Pakistan Airstrikes Afghanistan : पाकिस्तानचा अफागणिस्तानमध्ये जोरदार एअरस्ट्राईक; हल्ल्यामुळे मोठी हानी)
होर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक ऊर्जा व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या जलमार्गावरील वाहतूक दीर्घकाळ विस्कळीत राहिल्यास कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर आणि जागतिक बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अलीकडील काळात तेलाच्या किमतींनी १०० डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आहे. आताच्या अनिश्चित परिस्थितीमुळे किमतींवर आणखी विपरित परिणाम होऊ शकतो. आता इराणच्या अटींवर अमेरिका कशी प्रतिक्रिया देते आणि त्यातून वाटाघाटींचा मार्ग पुन्हा खुला होतो का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. (Iran US Conflict 2026)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
