India BRICS Export : भारताची ब्रिक्स देशांना निर्यात ३४ टक्क्यांनी वाढली

India BRICS Export : अगदी चीनला होणारी निर्यातही वाढली आहे. 

11
India BRICS Export : भारताची ब्रिक्स देशांना निर्यात ३४ टक्क्यांनी वाढली
  • ऋजुता लुकतुके

India BRICS Export                भारताच्या निर्यात क्षेत्रासाठी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत महत्त्वाची सकारात्मक घडामोड समोर आली आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत चीन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि रशिया या चार प्रमुख ब्रिक्स देशांना भारताची निर्यात ३४ टक्क्यांनी वाढून १९.९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ही निर्यात १४.९ अब्ज डॉलर होती. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारताच्या एकूण निर्यातीतील या चार देशांचा वाटाही ८.१ टक्क्यांवरून ९.२ टक्क्यांवर गेला आहे. (India BRICS Export)

या वाढीत चीनचा वाटा सर्वाधिक आहे. चीनला भारताची निर्यात ३९ टक्क्यांनी वाढून सुमारे ९.६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेला झालेली निर्यात मात्र या चार देशांमध्ये सर्वाधिक वेगाने वाढली असून त्यात तब्बल ५८ टक्क्यांची वाढ झाली. ब्राझीलला निर्यात १३ टक्क्यांनी, तर रशियाला निर्यात ११ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे भारताच्या निर्यात धोरणात ब्रिक्समधील प्रमुख अर्थव्यवस्थांचे महत्त्व वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसते. (India BRICS Export)

(हेही वाचा – Canadaमध्ये विमान अपघातात २ भारतीय वैमानिकांचा मृत्यू, प्रशिक्षणादरम्यान घडली दुर्घटना)

केवळ ब्रिक्स देशच नव्हे, तर जपान, इटली आणि दक्षिण कोरियाकडेही भारतीय निर्यातीने चांगली कामगिरी केली आहे. एप्रिल-ऑगस्ट २०२६ या कालावधीत जपानला भारताची निर्यात ४३ टक्क्यांनी वाढून ३.४३ अब्ज डॉलर झाली. यामध्ये खनिज इंधनांच्या निर्यातीत ७६ टक्क्यांची वाढ झाली असून इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲल्युमिनियमची निर्यातही वाढली आहे. (India BRICS Export)

इटलीला भारताची निर्यात सुमारे ३० टक्क्यांनी वाढून ३.९२ अब्ज डॉलर झाली, तर दक्षिण कोरियाला निर्यात २२ टक्क्यांनी वाढून ३.२१ अब्ज डॉलरवर पोहोचली. दक्षिण कोरियाकडे खनिजे, इंधन, इलेक्ट्रॉनिक्स, ॲल्युमिनियम, लोखंड-स्टील आणि रसायनांची निर्यात वाढली आहे. (India BRICS Export)

(हेही वाचा – BMW Accident Case : कोस्टल रोड अपघातातील BMW वर यापूर्वीही गुन्हा; मात्र FIR वेबसाईटवरुन गायब?)

भारताच्या निर्यातीतील ही वाढ ऊर्जा उत्पादने, औद्योगिक कच्चा माल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मध्यवर्ती उत्पादनांच्या वाढत्या मागणीशी जोडली जात आहे. जागतिक व्यापारातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर विविध मोठ्या बाजारपेठांमध्ये भारतीय उत्पादनांची उपस्थिती वाढवण्याच्या दृष्टीने हे आकडे महत्त्वाचे ठरत आहेत. (India BRICS Export)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.