India Defence Production: भारताचा ‘आत्मनिर्भर’ संरक्षणात नवा रेकॉर्ड! संरक्षण उत्पादन १.७८ लाख कोटींच्या ऐतिहासिक सर्वोच्च पातळीवर

India Defence Production: भारताचा ‘आत्मनिर्भर’ संरक्षणात नवा रेकॉर्ड! संरक्षण उत्पादन १.७८ लाख कोटींच्या ऐतिहासिक सर्वोच्च पातळीवर

104
India Defence Production
India Defence Production

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचे वार्षिक संरक्षण उत्पादन (India Defence Production) 1.78 लाख कोटी रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. हा महत्वाचा टप्पा मागील आर्थिक वर्षाच्या 1.54 लाख कोटी रुपये उत्पादनाच्या15.6% वाढ दर्शवतो, तसेच आर्थिक वर्ष 2020-21 पासून 110% वाढ दर्शवतो. त्यावेळी हा आकडा 84,643 कोटी रुपये इतका होता. आर्थिक वर्ष 2013-14 मधील 43,746 कोटी रुपयांच्या तुलनेत स्वदेशी संरक्षण उत्पादनात जवळजवळ चार पट वाढ झाली आहे. (India Defence Production)

हेही वाचा-सावधान! वडापाव छापील कागदात गुंडाळून द्याल तर गाठ FDA सोबत; २६ दुकानदारांवर कारवाई करत दीड लाखांचा दंड वसूल

संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम आणि इतर सार्वजनिक उपक्रमांचा एकूण उत्पादनात अंदाजे 76% वाटा आहे, तर खासगी क्षेत्राचा वाटा 24% आहे, आर्थिक वर्ष 2024-25 मधील 22% च्या तुलनेत यात वाढ झाल्याचे दिसून येते. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये खासगी क्षेत्राचा वाटा सुमारे 42,000 कोटी रुपयांच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. यावरून संरक्षण परिसंस्थेतील त्याची वाढती भूमिका प्रतिबिंबित होते. गेल्या काही वर्षांतील संरक्षण उत्पादनातील वाढीने, 2025-26 या आर्थिक वर्षात 38,424 कोटी रुपयांची विक्रमी संरक्षण निर्यात साध्य करण्यात मोलाचे योगदान दिले. ही कामगिरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत संरक्षण उत्पादनातील स्वयंपूर्णतेसाठी सरकारच्या प्रयत्नांनी साधलेली गती दर्शवते. (India Defence Production)

हेही वाचा- G7 परिषदेत PM Modi कडाडले; ट्रम्प यांच्या शेजारी बसून पश्चिम आशियातील भारतीय जहाजांवरील हल्ल्यांचा मुद्दा गाजला

‘एक्स’ (X) वरील एका पोस्टमध्ये, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या संरक्षण उत्पादनाने गाठलेल्या नव्या उंचीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाला दिले असून, या महत्वाच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी संरक्षण उत्पादन विभाग तसेच सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. प्रगतीचा कल हा देशाच्या संरक्षण उद्योगाच्या विस्ताराचे स्पष्ट सूचक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. सातत्यपूर्ण धोरणात्मक पाठबळ, अनेक नवीन उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग आणि वाढती निर्यात क्षमता यामुळे संरक्षण उत्पादन क्षेत्र पुढील काही वर्षांत निरंतर गती घेण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (India Defence Production)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.