India New Zealand Tour 2026 : न्यूझीलंड दौऱ्याच्या कार्यक्रमाची भारतीय संघाला चिंता; कार्यक्रम आखताना बीसीसीआयचं म्हणणं विचारात न घेतल्याचा आरोप

India New Zealand Tour 2026 : दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, ५ एकदिवसीय व २ कसोटी खेळणार. 

20
India New Zealand Tour 2026 : न्यूझीलंड दौऱ्याच्या कार्यक्रमाची भारतीय संघाला चिंता; कार्यक्रम आखताना बीसीसीआयचं म्हणणं विचारात न घेतल्याचा आरोप
  • ऋजुता लुकतुके

India New Zealand Tour 2026          भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्याच्या वेळापत्रकावरून आता खेळाडूंच्या कामाच्या ताणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित करताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी पुरेशी सल्लामसलत झाली नसल्याचं समोर आलं असून, तब्बल दोन महिन्यांच्या या दौऱ्यात भारतीय संघाला पाच टी-२०, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. (India New Zealand Tour 2026)

न्यूझीलंड दौरा २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, सलग तीनही प्रकारच्या क्रिकेटचा समावेश असल्याने प्रमुख खेळाडूंवरील ताण वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कसोटी आणि मर्यादित षटकांच्या मालिकांमधील कमी अंतरामुळे खेळाडूंच्या विश्रांती, सराव आणि प्रवासाचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, के.एल. राहुल आणि मोहम्मद सिराज यांसारखे खेळाडू तीनही प्रकार खेळत असल्यामुळे त्यांच्या कामाच्या ताणाचे व्यवस्थापन बीसीसीआयसमोरचे मोठे आव्हान ठरू शकते. (India New Zealand Tour 2026)

(हेही वाचा – Tukaram Mundhe Transfer : बदलीच्या चर्चांवर तुकाराम मुंढेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “बदली झालीच तर…” )

विशेष म्हणजे, बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच खेळाडूंच्या वाढत्या कामाच्या ताणाबाबत चिंता व्यक्त केली होती. सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले होते की, इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोन महिन्यांच्या आयपीएलनंतर खेळाडूंना सलग सामने खेळावे लागल्याने दुखापतींचा धोका वाढला. भविष्यात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या दौऱ्यांसाठी पुरेशी विश्रांती, वातावरणाशी जुळवून घेण्याचा कालावधी आणि सराव सामने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भविष्यातील कार्यक्रमात बदल करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. (India New Zealand Tour 2026)

याच पार्श्वभूमीवर न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक भारतीय संघासाठी किती आव्हानात्मक ठरते, याकडे लक्ष लागले आहे. सध्या बीसीसीआयकडून या वेळापत्रकावर अधिकृतपणे आक्षेप नोंदवण्यात आलेला नसला, तरी खेळाडूंच्या तंदुरुस्तीला प्राधान्य देण्यासाठी विश्रांती आणि संघरचनेत बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा अष्टपैलू रचिन रवींद्र यालाही भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी दुखापत झाली असून, त्याच्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. (India New Zealand Tour 2026)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.