Dombivli : ठाकुर्ली पूल प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचा मुद्दा महासभेत

पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची नगरसेवक दिपेश म्हात्रेंची मागणी

112
ठाकुर्ली पूल प्रकल्पाचे अर्धवट बांधकाम डोंबिवलीत
Dombivli : ठाकुर्ली पूल प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचा मुद्दा महासभेत
  • कल्याण, प्रतिनिधी

Dombivli           मध्य रेल्वेमार्गावरील डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिमेला जोडणारा ठाकुर्ली उड्डाणपूल बाधितांच्या मोबदल्या अभावी रखडला आहे. बंद अवस्थेत पडलेल्या अर्धवट पुलाचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी सोमवारी झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी लावून धरली हाती. या उड्डाणपुलाशी संबंधित २७ प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचा विषय चर्चेला आला होता. गेल्या १० वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. (Dombivli)

(हेही वाचा – Veer Savarkar बदनामी खटला; जाणून घ्या खरी बाजू; उलटतपासात सात्यकी सावरकरांची सडेतोड उत्तरे)

ठाकुर्ली ब्रिज हा डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाचा दळणवळण मार्ग आहे. हा पूल पूर्ण झाल्यास परिसरातील वाहतूक कोंडीत मोठी घट होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ठाकुर्ली स्थानकापर्यंत या पुलाची अर्धवट उभारणी केली आहे. पुढे हा पुल आधांतरीत लटकलेला आहे. सोमवारच्या महासभेदरम्यान नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी हा विषय आक्रमकपणे मांडला. प्रकल्प बाधितांना तातडीने घरे उपलब्ध करून द्यावीत आणि ठाकुर्ली पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी लक्षात घेता या प्रकल्पाला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. (Dombivli)

(हेही वाचा – ​’शिवबंधना’ची वीण विरली; शिवसेना उबाठातील अंतर्गत वादावरून BJP चा खळबळजनक दावा)

डोंबिवलीचे आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि स्थानिक नगरसेवक राहूल दामले, शशिकांत कांबळे, खुशबू चौधरी, शारदा चौधरी यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली आहे. सर्व अडथळे दूर करून पुनर्वसन त्वरित पूर्ण करावे आणि पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी अपेक्षा महासभेमध्ये सर्वसाधारणपणे व्यक्त झाली. (Dombivli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.