
-
प्रतिनिधी
Marathi vs Jain विद्याविहार येथील सोसायटीत सुरू झालेला फुटपाथवरील ‘पांढऱ्या पट्ट्या’चा वाद आता संपूर्ण मुंबईभर पसरताना दिसत आहे. गिरगाव, लालबाग आणि बोरिवलीसारख्या महत्त्वाच्या भागातही या पट्ट्यांवरून तणाव निर्माण झाला आहे. या पांढऱ्या पट्ट्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून, या आंदोलनाचे पडसाद आता पोलीस कारवाईपर्यंत पोहोचले आहेत. (Marathi vs Jain)
(हेही वाचा – ’शिवबंधना’ची वीण विरली; शिवसेना उबाठातील अंतर्गत वादावरून BJP चा खळबळजनक दावा)
गिरगावातील फुटपाथवर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांना मनसे कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला होता. या पट्ट्यांवर करड्या रंगाचा स्प्रे मारून निषेध नोंदवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर, सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २२३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Marathi vs Jain)
(हेही वाचा – Bihar मध्ये पाकिस्तान कनेक्शन उघड; आयएसआय एजंटच्या अटकेनंतर ‘कट्टरपंथी मॉड्युल’ उद्ध्वस्त; अनेक राज्यांमध्ये धाडसत्र सुरू )
या कारवाईनंतर मनसेच्या गोटातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “आंदोलन करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जातात, मग सार्वजनिक रस्त्यावर आणि फुटपाथवर कुणाच्या परवानगीने हे पांढरे पट्टे मारले जात आहेत? हे काम करणाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही?” असा खडा सवाल मनसेने प्रशासनाला विचारला आहे. सध्या मुंबईतील विविध भागांत हा वाद चिघळत चालला असून, प्रशासकीय स्तरावर याबाबत काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Marathi vs Jain)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
