-
प्रतिनिधी
BJP उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवबंधनामध्ये आता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची धार उरलेली नसून, केवळ नावालाच हे बंधन उरले आहे, अशी घणाघाती टीका भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे. आमदार आणि खासदारांना पक्षात टिकवून ठेवण्यासाठी केवळ शपथा किंवा शिवबंधनाचे धागे पुरेसे नसून, त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि माणुसकीची गरज असते, मात्र सध्याच्या नेतृत्वाकडे याचा अभाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (BJP)
(हेही वाचा – Kalyan ची गणेश टेकडी वाचविण्यासाठी मनसे आक्रमक; बिल्डर लॉबीला खळखट्याक् चा इशारा)
पक्ष सोडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींबाबत बोलताना बन म्हणाले की, उद्धव ठाकरेंकडे कार्यकर्त्यांबद्दल माणुसकी उरली नसल्यानेच हे लोक अन्यत्र आश्रय शोधत आहेत. उद्धव ठाकरे सर्वांना सहज उपलब्ध होतात, हा दावा खोडून काढताना त्यांनी “हा या दशकातील सर्वात मोठा विनोद” असल्याची उपरोधिक टिप्पणी केली. खुद्द संजय राऊत यांनाही अनेकदा ‘मातोश्री’वर प्रवेश मिळत नसल्याचा दावा करत, त्यांनी राऊतांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पत्राचाळ घोटाळ्याचा संदर्भ देत त्यांनी संजय राऊत यांना खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवरूनही घेरले. (BJP)
(हेही वाचा – “पाकिस्तानवर आमचा विश्वास नाही”; US-Iran Peace Deal वरुन नाराज इस्रायलचे पाकिस्तानला खडेबोल)
भाजपा नेत्यांवरील कारवाईच्या आरोपांना उत्तर देताना, बन यांनी स्पष्ट केले की, ईडी किंवा सीबीआयच्या ताकदीवर माणसे टिकवता येत नाहीत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या संघर्षाचे उदाहरण देत, त्यांनी शिवसेना उबाठाला आत्मचिंतनाचा सल्ला दिला. “जनतेने निवडणुकीत तुम्हाला मतरूपी जोडे मारले आहेत, त्या व्रणांचा विसर पडू देऊ नका,” असा इशाराही त्यांनी दिला. अभिजीत दिपके यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत, लोकशाहीत हिंसेला स्थान नसून भाजपा अशा कृत्यांचे कधीही समर्थन करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

