-
कल्याण, प्रतिनिधी
Kalyan कल्याण पूर्वेतील गणेश टेकडीचा एक छोटासा भाग देखील कोणत्याही बिल्डरला गिळंकृत करू देणार नाही. तसे कृत्य करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास खळखट्याक् करणार असल्याचा स्पष्ट इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश टेकडी येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाच्या माध्यमातून राजसैनिकांनी हा इशारा दिला आहे. (Kalyan)
(हेही वाचा – नागपुरात ‘Love Jihad’चा संतापजनक प्रकार; जवानाच्या पत्नीवर अत्याचार करत जबरदस्तीने केला धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न)
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी राजसैनिकांनी कोणत्याही प्रकारचे शक्तिप्रदर्शन किंवा खर्च न करता केवळ वृक्षारोपण आणि जलसंधारणाची कामे करावीत, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कल्याण पूर्वेतील राजसैनिकांनी गणेश टेकडी परिसरात ५८ वृक्षांची लागवड केली. यावेळी अंकुश राजपूत यांनी टेकडीवर वक्रदृष्टी केलेल्या बिल्डर लॉबीचा खरपूस समाचार घेतला. शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे आणि वृक्षतोडीमुळे प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. परिणामी वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत. आजूबाजूच्या बिल्डरांनी गणेश टेकडी पोखरून खाल्ली आहे, ज्यामुळे टेकडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही टेकडी वाचवण्यासाठी मनसे कटिबद्ध असून, यापुढे एक इंचही जागा लाटण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा सूचक इशारा अंकुश राजपूत यांनी यावेळी बोलताना दिला. (Kalyan)
(हेही वाचा – “पाकिस्तानवर आमचा विश्वास नाही”; US-Iran Peace Deal वरुन नाराज इस्रायलचे पाकिस्तानला खडेबोल)
नाशिक येथील कुंभमेळ्याचा संदर्भ देत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी सरकारवरही निशाणा साधला. मनसेची सत्ता असताना नाशिकमध्ये कुंभमेळा झाला तेव्हा एकही झाड तोडण्यात आले नव्हते. मात्र आताच्या सरकारकडून विकासकामांच्या नावाखाली लाखो झाडांची कत्तल केली जात असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण प्रसंगी केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजसैनिकांनी नागरिकांना केवळ वृक्षारोपण न करता, उपलब्ध जागेत झाडे जगवण्याचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Kalyan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

